मुंबई : करिश्मा कपूर गेल्या काही वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. मात्र, करिश्मा कायमच चर्चेत असते. करिश्मा कपूर हिने तिच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. करिश्माची पर्सनल लाईफ चर्चेत असते. करिश्मा हिचे 2003 मध्ये संजय कपूर याच्याशी लग्न झाले होते. 2016 मध्ये करिश्मा हिने संजय कपूर याच्यासोबत घटस्फोट घेतला. करिश्मा आणि संजय यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहेत.
करिश्मा कपूर हिचे लग्न झाल्यानंतर पहिल्याच दिवसापासून तिला प्रचंड त्रास देण्यात आला होता. पिंकविलाच्या रिपोर्ट्सनुसार लग्नानंतर जेंव्हा करिश्मा कपूर ही हनिमूनला गेली होती. तेंव्हा तिच्या पतीने चक्क तिची बोलीच लावली होती.
संजय कपूर याने मित्रांसोबत करिश्मा कपूरची बोली लावली. या सर्वांना जेंव्हा करिश्मा कपूर हिने विरोध केला त्यावेळी करिश्माला मारहाण करण्यात आली. या घटनेशी संबंधित अनेक धक्कादायक खुलासे करिश्मा हिने केले होते.
इतकेच नाहीतर करिश्मा हिने संजय कपूर याच्यावर अनेक गंभीर आरोप देखील केले आहेत. करिश्माने सांगितले की, माझ्यासोबत लग्न केल्यावरही त्याचे आणि त्याच्या पहिल्या पतीचे शारीरिक संबंध होते.
यावर जेंव्हा करिश्मा हिने संजय कपूर याला प्रश्न विचारले त्यावेळी त्याने त्याची चूक कधीच मान्य केली नाही. उलट यानंतर करिश्माला मारहाण करण्यात आली. करिश्मासोबत घटस्फोट घेतल्यानंतर संजय कपूर याने तिसऱ्यांदा लग्न केले.
अभिषेक बच्चन याच्यासोबत करिश्मा कपूर हिचा साखरपुडा झाला होता. मात्र, अचानक यांचा साखरपुडा तुटला आणि करिश्मा कपूर हिने संजय कपूर याच्याशी लग्न केले. परंतू हे लग्न फार काळ टिकू शकले नाही.