मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही कायम चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून मलायका अरोरा ही बाॅलिवूड अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करत आहे. विशेष म्हणजे अनेकदा हे दोघेसोबतच स्पाॅट देखील होतात. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) हे लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा देखील काही दिवसांपूर्वी रंगल्या होत्या. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सतत मलायका अरोरा हिचे नाव एका फेमस गायकासोबत (Famous singer) जोडले जात आहे. इतकेच नाहीतर अनेकांनी थेट अर्जुन कपूर याचा पत्ता कट झाल्याचे देखील म्हटले आहे. त्याचे कारणही तेवढे खास आहे.
काही दिवसांपूर्वी गुरु रंधावा आणि मलायका अरोरा यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. विशेष म्हणजे या फोटोमध्ये गुरु रंधावा आणि मलायका अरोरा एकदम रोमँटिक दिसले. यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. अनेकांनी मलायका अरोरा हिने अर्जुन कपूर याला धोका दिल्याचे देखील म्हटले होते.
मलायका अरोरा आणि गुरु रंधावा यांचा एक गाण्याच्या व्हिडिओ नुकताच रिलीज झालाय. या गाण्याचे नाव तेरा की ख्याल आहे. हे गाणे मंगळवारी यूट्यूबवर रिलीज करण्यात आले आहे. यामध्ये मलायका आणि गुरूचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे हे गाणे चाहत्यांना देखील आवडताना दिसत आहे.
मलायका अरोरा हिचा तेरा की ख्याल या गाण्यामध्ये बोल्ड लूक दिसत आहे. या गाण्याच्या सुरुवातीला गुरू रंधावा बसलेला दिसत आहे. त्यानंतर मलायका अरोरा हिची ग्लॅमरस अंदाजात एंट्री होते. त्यानंतर गुरु तेरा की ख्याल हे गाणे गाताना दिसत आहे. चाहत्यांना या गाण्यातील मलायका अरोरा हिची बोल्ड लूक आवडलाय.
मलायका अरोरा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. मलायका ही तिच्या शोमधून तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठे खुलासे करताना दिसत आहे. अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा 2017 मध्ये घटस्फोट झाला. असे असूनही हे दोघे अनेकदासोबत स्पाॅट होतात. या दोघांचा अरहान खान नावाचा एक मुलगा देखील आहे. या दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्या आल्या होत्या. त्यावेळी चाहत्यांना मोठा धक्काच बसला होता.