मुंबई : आपल्या साधेपणा आणि बिनधास्तपणासाठी प्रसिद्ध असलेल्या सारा अली खान प्रसिद्ध आहे. श्रीमंत घरातील असूनही ती अत्यंत साधी राहते. मनमिळावू आहे. तसेच लोकांशी प्रचंड कनेक्ट असते. आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ बाबतची माहिती ती नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते. सारा खूप डाऊन टू अर्थ आहे. अनेकदा ती पब्लिक प्लेसमध्येही दिसली. पुन्हा एकदा ती सार्वजनिक ठिकाणी दिसली आहे. मुंबई मेट्रोतून प्रवास करताना सारा दिसली आहे. या सफरीचा व्हिडीओही तिने शेअर केला आहे.
सारा अली खानने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती मेट्रोतून प्रवास करताना दिसत आहे. या प्रवासावेळी तिने व्हाईट आणि पिंक कलरचा ड्रेस घातला आहे. तसेच हसत हसत सर्वांना हात करताना दिसत आहे. सारा लग्जरी कार सोडून मेट्रोतून प्रवास करताना खूप आनंदी दिसत आहे. मुंबई मेरी जान असं कॅप्शनही तिने या व्हिडीओ दिलं आहे. याशिवाय सहा सेकंदाच्या या व्हिडीओत बॅकग्राऊंडला प्रितमचं प्रसिद्ध गाणं इन दिनो… ऐकायला मिळलतंय.
सारा अली खान अनुराज बसू यांच्या आगामी सिनेमात बिझी आहे. ‘मेट्रो इन दिनों’ असं या सिनेमाचं नाव आहे. तिच्यासोबत आदित्य रॉय कपूर दिसणार आहे. या व्हिडीओत तिने दिग्दर्शक अनुराग काश्यप आणि आदित्य रॉय कपूरला टॅग केलं आहे. तुमच्या दोघांच्या आधीच मी मेट्रोतून प्रवास करेल असं वाटलं नव्हतं, असं तिने या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
जानेवारीच्या सुरुवातीलाच सारा अली खान आणि आदित्य रॉय कपूरने 2023च्या अखेरपर्यंत एका सिनेमात काम करणार असल्याचं म्हटलं होतं. हा चित्रपट डिसेंबर 2023मध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमात अनुपम खेर, नीना गुप्ता, फातिमा सना शेख आणि अली फजलही दिसणार आहे. यापूर्वी सारा अली खान गॅसलाईट या सिनेमात दिसली होती. हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज झाला होता.