मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन हिचे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्याचे कारण म्हणजे ललित मोदी यांनी सोशल मीडियावर सुष्मिता सेनसोबतचा एक खास फोटो शेअर केला होता. हा फोटो बघितल्यानंतर अनेकांना मोठा धक्काच बसला. सुष्मिता सेन आणि ललित मोदी हे एकमेकांना डेट करत आहेत. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमुळे आता सुष्मिता सेन चर्चेत आलीये. बाॅलिवूडमधील करिअरच्या सुरूवातीच्या दिवसांमधील एक किस्सा सुष्मिता सेन हिने सांगितला आहे.
महेश भट्ट हे सुष्मिता सेन हिला असे काही बोलले होते की, ते बोलणे ऐकून सुष्मिता सेन ही ढसाढसा रडायलाच लागली होती. इतकेच नाहीतर तिला इतका जास्त राग आला होता की, त्यावेळी सुष्मिता ही महेश भट्ट यांना म्हटली होती, तुम्ही मला असे बोलू शकत नाहीत.
मिस यूनिवर्स झाल्यानंतर सुष्मिता सेन हिच्याकडे चित्रपटाच्या मोठ्या प्रमाणात आॅफर आल्या होत्या. मात्र, आपले बाॅलिवूड पदार्पण तिला खास करायचे असल्यामुळे तिने महेश भट्ट यांच्या चित्रपटामध्ये काम करण्याचा निर्णय घेतला.
अभिनय जमत नसल्याने परत तिने महेश भट्ट यांना चित्रपटासाठी नकार दिला. परंतू महेश भट्ट यांनी तिला समजावून सांगत चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केली. सुष्मिताने सांगितले की, दस्तक चित्रपटामधील एका सीनमध्ये मला कानातले काढून कोणाच्यातरी अंगावर फेकायचे होते.
हा सीन मला समजत नव्हता. हे पाहून महेश भट्ट माझ्यावर चिडले…त्यावेळी तिथे 40 मीडियाचे लोक आणि 20 प्राॅडक्शन असिस्टेंट होते. हे पाहून मला रडू आले आणि मी त्यांना रागामध्ये म्हटले की, तुम्ही मला असे बोलू शकत नाहीत. यावर महेश भट्ट म्हणाले, तुला सीनमध्ये असाच राग आणायचा आहे…विशेष म्हणजे तो सीन मी लगेचच केला.