मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) आणि चित्रपट निर्माते नीरज घायवान (Neeraj Ghyawan) यांनी ड्रग्स प्रकरणात आर्यन खानच्या अटकेदरम्यान सुपरस्टार शाहरुख खानला पाठिंबा दिला आहे. लेखक अखिल कात्याल यांच्या व्हायरल कवितेद्वारे त्यांनी हे समर्थन दर्शवले आहे. दोन्ही सेलिब्रिटींनी त्यांच्या ट्विटर टाईमलाइनवर शाहरुख खानला टॅग करत किंग खानला समर्पित अखिल कात्यालची कविता शेअर केली आहे. या कवितेत शाहरुख खानने साकारलेल्या सर्व पात्रांचा उल्लेख आहे, ज्यामुळे तो बॉलिवूडचा किंग खान बनला आहे.
ही कविता इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या कवितेत एकीकडे शाहरुख खानने साकारलेल्या सर्व पात्रांची स्तुती केली आहे. तर, दुसरीकडे, ड्रग प्रकरणी आर्यन खानच्या अटकेवर शाहरुख खानवर निशाणा साधणाऱ्या त्या लोकांवरही कटाक्ष टाकला आहे.
अभिनेत्री स्वरा भास्करने अखिल कात्यालची कविता शेअर केली आहे, ज्यात लिहिलेय की, ‘वह कभी राहुल है, कभी राज, कभी चार्ली तो कभी मैक्स, सुरिंदर भी वो, हैरी भी वो, देवदास भी और वीर भी, राम, मोहन, कबीर भी, वो. अमर है, समर है, रिज़वान, रईस जहांगीर भी.’ स्वरा भास्करने ही कविता तिच्या टाईमलाइनवर शाहरुख खानला हार्ट इमोजीसह टॅग करत शेअर केली.
?✨ @iamsrk https://t.co/uFBF1R9UCT
— Swara Bhasker (@ReallySwara) October 11, 2021
त्याचवेळी, चित्रपट निर्माते नीरज घायवान यांनी देखील आपल्या टाईमलाइनवर शाहरुख खानला ‘लव्ह यू हार्ट’ कॅप्शनसह टॅग करत ही कविता शेअर केली आहे.
“Bandhan Hai Rishton Mein⁰Kaaton Ki Taarein Hain⁰Patthar Ke Darwaaze Deewaarein
Belein Phir Bhi Ugti Hain⁰Aur Guchchhe Bhi Khilte Hain⁰Aur Chalte Hain Afsaane⁰Kirdaar Bhi Milte Hain⁰Vo Rishtey Dil Dil Dil Thay”Love you @iamsrk! Dil se. https://t.co/nhVTmKpyUE
— Neeraj Ghaywan (@ghaywan) October 11, 2021
लेखक अखिल कात्याल यांच्या कवितेच्या या काही ओळी ट्विटरवर येताच ती अधिकाधिक व्हायरल झाली. शाहरुख खानच्या चाहत्यांनी आणि हितचिंतकांनी ही कविता जोरदारपणे शेअर केले. मात्र, या कवितेच्या आगमनापूर्वीच, बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी आर्यन खान ड्रग्सच्या प्रकरणात शाहरुख खानच्या समर्थनार्थ आले होते. त्यापैकी पूजा भट्टचे नाव सर्वात वर होते. नंतर सुनील शेट्टी, हंसल मेहता, सुझान खान, हृतिक रोशन, रवीना टंडन, सोनू सूद, आलिया भट्ट यांच्यासह बॉलिवूडच्या अनेक मोठ्या सेलिब्रिटींची नावे त्यात सामील झाली.
3 ऑक्टोबर रोजी NCB ने Cordelia Cruises च्या क्वीन जहाजावर औषधांचा भंडाफोड केला होता. या प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या कोठडीत आहे.
क्रूझ ड्रग्स प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. याचा अर्थ आर्यन खानला तुरुंगात रहावे लागणार आहे. आर्यनसह 5 जणांना कारागृहाच्या पहिल्या मजल्यावर बॅरेक क्रमांक 1 मध्ये ठेवण्यात येणार आहे. सर्व आरोपींना इतर कैद्यांप्रमाणेच वागणूक देण्यात येणार असून, कारागृहाचा गणवेश परिधान करावा लागणार आहे. आरोपींना बाहेरचे अन्न घेता येणार नाही. तसेच सर्वांना 5 दिवस विलगीकरणात ठेवणार असून, काही लक्षणे असल्यास कोरोना चाचणी केली जाईल. गुरुवारी या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती.