मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज (19 नोव्हेंबर) प्रकाशपर्व निमित्त देशाला संबोधित केले. या भाषणात त्यांनी तीनही कृषी कायदे (Farm Laws) मागे घेण्याची घोषणा केली. तीनही कृषी कायदे मागे घेण्यासाठी गेल्या वर्षभरापासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत होते. या आंदोलनात आतापर्यंत 500 हून अधिक शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला आहे. पीएम मोदींच्या या घोषणेनंतर सोशल मीडियावर देखील सतत प्रतिक्रिया येत आहेत आणि बॉलिवूड स्टार्सही आपलं मत मांडत आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने (Taapsee Pannu) पंतप्रधानांच्या घोषणेचा स्क्रीन शॉट ट्विट केला आहे आणि लिहिले आहे की, ‘गुरुपर्व दिया सब नू बधाईयां’.
Also….. Gurpurab diyaan sab nu vadhaiyaan ?? https://t.co/UgujPdw2Zw
— taapsee pannu (@taapsee) November 19, 2021
शेतकऱ्यांच्या विकासासाठी तीन कृषी कायदे आणले होते. छोट्या शेतकऱ्यांना आणखी ताकद मिळावी, वर्षानुवर्षे ही मागणी होती. देशातील कृषी वैज्ञानिक, शेतकरी संघटना यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्ही प्रामाणिक हेतूनं शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे आणले. आम्ही ही गोष्ट शेतकऱ्यांना समजावून सांगू शकलो नाही. अर्थशास्त्रज्ञ, शेतकरी यांनी त्यांना कृषी कायदे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न व्यक्तिगत आणि सामूहिक पातळीवर सांगण्याचा प्रयत्न केला.
आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांच्या समस्या, बदलण्यास तयार झालो. कायदे दोन वर्ष स्थगित करण्यास तयार झालो. पण केंद्रीय कृषी कायद्यांचा विषय सुप्रीम कोर्टात गेला. मला त्याच्या अधिक खोलात जायचं नाही. देशवासियांची माफी मागून सांगतो की, आमची तपश्चर्या कमी पडली असेल. दिव्याच्या प्रकाशासारखं सत्य आम्ही शेतकऱ्यांना समजावून सांगू शकलो नाही. आज गुरुनानक यांचं प्रकाश पर्व आहे. आज मी कोणालाही दोष देणार नाही. येणाऱ्या संसंदेच्या अधिवेशनात आम्ही ते कायदे रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. आता आम्ही हे कायदे रद्द करत असल्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
मी आंदोलक शेतकऱ्यांना आवाहन करतो, की तुम्ही घरी परत जा. शेतात जा. आपण नवी सुरुवात करत आहोत. आपण आजपासून नवी सुरुवात करत आहोत. आपण झिरो बजेट शेतीला सुरुवात करत आहोत, असं मोदी म्हणाले. पिकांची रचना बदलण्यासाठी, एमएपसी वाढवण्यासाठी एका समितीची स्थापना करणार आहेत. या कमिटीत केंद्र सरकार, राज्य सरकार, कृषी अर्थशास्त्रज्ञ, शेतकरी संघटना यांचे सदस्य सहभागी असतील, असं मोदी म्हणाले.