मुंबई : सुप्रसिद्ध टीएमसी खासदार (TMC MP) आणि अभिनेत्री नुसरत जहाँ (Actress Nusrat Jahan) आज आपल्या पहिल्या मुलाला जन्म देऊ शकते. पती निखिलपासून विभक्त झाल्यानंतर ती प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. बुधवारी तिला पार्कस्ट्रीट येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यावेळी अभिनेता यश दासगुप्ताही तिच्यासोबत होता. गुरुवारी सकाळी तिनं हॉस्पिटलमधून स्वतःचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. काही महिन्यांपूर्वी जेव्हा ती आपल्या पतीपासून विभक्त झाली तेव्हा ती निखिलसोबत लिव्ह-इनमध्ये राहत असल्याचा दावा केला जातोय.
निखिल जैननं दावा केला होता की मूल हे त्याचं नसून सध्या नुसरत यशसोबत असते. हॉस्पिटलच्या सूत्रांनी सांगितलं आहे की सी-सेक्शनची प्रक्रिया आजपासून सुरू होईल. आवश्यक असल्यास, शस्त्रक्रिया केली जाईल. नुसरतचं नाव बंगाली चित्रपट अभिनेता यश दासगुप्ताशी जोडलं जात आहे. यश दासगुप्तानं नुसरत जहाँच्या आई होणार असल्याबद्दल आनंद व्यक्त केला होता.
पाहा नुसरतची पोस्ट
नवऱ्यापासून विभक्त झाल्यानंतर चर्चेत
नुसरत काही महिन्यांपूर्वी तिचं लग्न तुटल्यामुळे चर्चेत आली होती. कोलकाता येथील उद्योजक निखिल जैन याच्याशी तिचं लग्न वादात सापडलं तेव्हा तिनं आपलं हे लग्न अवैध असल्याचं सांगितलं होतं. गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून हे दोघं वेगळे राहत होते. नुसरतनं सांगितलं होतं की तिचं निखिलसोबतच लग्न अवैध आहे कारण ते तुर्की रीतीरिवाजांनुसार झालं होतं आणि भारतात विशेष विवाह कायद्यानुसार याला मान्यता नाही, त्यामुळे घटस्फोटाचं कारणच येत नाही.
पती निखिल जैननं केले अनेक आरोप
यानंतर निखिलनं नुसरतवर अनेक आरोपही केले होते, त्यानं म्हटलं होतं की नुसरतनं त्याच्याकडून खूप पैसे घेतले होते आणि नुसरतच्या पोटातील मूल हे त्याचं नाही. निखिल आणि नुसरत यांनी 2019 मध्ये तुर्कस्तानच्या बोडरम येथं धूमधडाक्यात लग्न केलं होतं.
संबंधित बातम्या
Monalisa : निळाशार समुद्र… वाळू… रणरणते उन आणि मोनालिसाचा बोल्डनेसचा तडका; फोटो पाहाच
Shama Sikandar : शमा सिकंदरची टोपीसोबत हॉट फोटो पोज, बोल्ड स्टाईलनं वाढला इंटरनेटचा पारा