मुंबई : कोरोना काळात एक नाव प्रचंड चर्चेत आले, ते म्हणजे आदर पुनावाला (Adar Poonawalla). कोरोनावरील वॅक्सीन बनवारी कंपनी म्हणजे सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया आहे. आदर पुनावाला यांनी भारताला कोरोनावरील वॅक्सीन उपलब्ध करून दिली. कोरोनानंतर आदर पुनावाला यांना एक खास ओळख मिळाली. सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाने (Serum Institute of India) फक्त भारतामध्येच नाही तर विदेशात देखील कोरोनावरील वॅक्सीन दिल्या. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काही दिवसांपूर्वीच पुण्यातील सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट दिली. आदर पुनावाला यांची पत्नी सध्या तूफान चर्चेत आहे, त्याचे कारणही तेवढेच मोठे आहे.
आदर पुनावाला यांची पत्नी नताशा पुनावाला ही कायमच तिच्या फॅशनमुळे चर्चेत राहते. इतकेच नाही तर बऱ्याच वेळा तिच्यावर टिका देखील केली जाते. मेट गाला 2023 मध्ये आलिया भट्ट हिचा जलवा हा बघायला मिळाला आहे. यामध्ये डेब्यू हा आलिया भट्ट हिने केला आहे. आलिया भट्ट हिच्यामुळे सर्वांच्या नजरा या मेट गाला 2023 कडे होता. मात्र, आलिया भट्ट हिच्यापेक्षाही सध्या नताशा पुनावाला हिच्या नावाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.
मेट गाला 2023 मध्ये नताशा पुनावाला ही देखील सहभागी झाली होती. नताशा पुनावाला हिची फॅशन पाहून अनेकांना मोठा धक्का बसलाय. अतरंगी ड्रेसमध्ये नताशा पुनावाला ही दिसली आहे. मेट गालामध्ये नताशा सिल्वर रंगाच्या गाऊनमध्ये दिसली आहे. नताशा हिचा हा ड्रेस पाहून अनेकांना मोठा धक्का बसलाय. नताशा हिने घातलेला हा ड्रेस अत्यंत चमकदार होता.
नताशा हिच्या या लूकची जोरदार चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे. एकाने कमेंट करत लिहिले की, मॅडम तुम्ही हे नेमके काय घातले आहे? दुसऱ्याने लिहिले की, ही नेमकी कोणती इमारत आह? तिसऱ्याने लिहिले की, तुम्ही नक्कीच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करायला हवे, तुमच्यासाठी तिच एक योग्य जागा आहे. अजून एकाने लिहिले की, मला तुमचा हा खास ड्रेस खूप आवडला आहे.
आदर पुनावाला आणि नताशा यांचे लग्न 2006 मध्ये झाले असून यांना दोन मुले देखील आहेत. नताशा पुनावाला ड्रेसमुळे कायमच चर्चेत असते. मेट गालामध्ये गेल्या वर्षी देखील नताशा पुनावाला हटके स्टाईलमध्ये पोहचली होती. यावेळच्या लूकही देखील जोरदार चर्चा होताना दिसत आहे. काही लोक नताशाच्या फॅशनचे काैतुक करत आहेत तर काही लोक हे नताशा हिला टार्गेट करताना दिसत आहेत.