मुंबई : ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात असते. महिन्याभरापूर्वीच तिने इस्लामचा स्वीकार केला. त्यानंतर ती राखीची फातिमा झाली. राखीच्या या तडकाफडकी निर्णयामुळे तिच्या चाहत्यांच्या भुवया उंचावल्या. पण राखीने त्याची पर्वा केली नाही. आपल्या मनाला जे वाटतं तेच राखी करत असते. यावेळीही तिने तेच केलं. पण आता तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात तिने बुरखा घातला आहे. हा बुरखा का घातला? याचं कारण ती सांगताना दिसत आहे. मात्र, हे सांगताना डॅशिंग राखी हतबल वाटत आहे. आपला नवरा आणि सासू-सासरे आपल्याला साथ देत नसल्याचं ती सांगत आहे.
ड्रामा क्वीन राखी सावंतने एक नवीन व्हिडिओ रिलीज केला आहे. ज्यामध्ये तिने बुरखा घातला आहे. सासू आणि सासरच्या लोकांना खूश करण्यासाठी बुरखा घातल्याचे सांगताना राखी दिसत आहे. मी हिंदू आहे. म्हणून मला आदिलच्या आई वडिलांनी अजून स्वीकारले नाही, असंही राखी या व्हिडीओत म्हणताना दिसत आहे. आदिलच्या आईवडिलांनी स्वीकारावे म्हणूनच तिने बुरखा घातल्याचं ती म्हणत आहे.
जर मी इस्लाम स्वीकारला तर माझ्या सात पिढ्या स्वर्गात जातील. मी नमाज अदा करते म्हणून इस्लामचा स्वीकार केला. आज मी माझ्या पती आणि सासू सासरच्या लोकांच्या सन्मानार्थ बुरखा साडी परिधान करून आले आहे. आता मी काय करू? मी इस्लाममध्ये राहावे की मी जिथून आलो तेथे परत जावे?, असा हतबल सवाल राखी करताना दिसत आहे.
सासू-सासरे साथ देत नाहीत. नवरा साथ देत नाही, असं तिचं म्हणणं आहे. या व्हिडीओत राखी म्हैसूरसह संपूर्ण भारतातील मुस्लिम मौलानांना न्यायाची मागणी करताना दिसत आहे. तर एका व्हिडिओमध्ये राखी बुरख्यामध्ये नमाज पढताना दिसत आहे.
दोन दिवसांपूर्वी राखी जीममध्ये आली होती. यावेळी तिने बुरखा परिधान केला होता. राखी बुरखा घालून आली. पण गाडीतून उतरताना आणि जिममध्ये प्रवेश करताना तिने बुरखा काढला. बुरखा काढून ती पिवळ्या रंगाच्या जीम वियरमध्ये जीममध्ये गेली. राखीच्या मुव्हमेंट कॅमेऱ्यात कैद झाल्या. त्यामुळे ती ट्रोलही होऊ लागली आहे.