मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चाहते साऊथ स्टार प्रभास याच्या आदिपुरुष (Adipurush) या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये सतत बदल होताना दिसत होते. यापूर्वी दोन वेळा आदिपुरुष चित्रपटाची रिलीज डेट (Adipurush Release Date) बदलण्यात आलीये. प्रभास या चित्रपटामध्ये धमाका करताना दिसणार आहे. या चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ सुरूवातीपासूनच बघायला मिळत आहे. मात्र, आता प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली आहे. नुकताच आदिपुरुष चित्रपटाची (Movie) रिलीज डेट जाहिर करण्यात आलीये. यामुळे चाहत्यांमध्ये आता आदिपुरुष चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता बघायला मिळत आहे.
नुकताच आदिपुरुष चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाची तारीख जाहिर केलीये. या चित्रपटात प्रभाससोबत अभिनेत्री क्रिती सेनॉन देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत क्रिती सेनॉन आणि प्रभास यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहेत. प्रभास आणि क्रिती सेनॉन हे एकमेकांना डेट करत असल्याचे सांगितले जातंय.
विशेष म्हणजे आदिपुरुष या चित्रपटामध्ये फक्त प्रभासच नाहीतर सैफ अली खान हा देखील मुख्य भूमिकेत आहे. काही दिवसांपासून सैफ अली खान याच्या चित्रपटातील लूकमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. क्रिती सेनॉनही या चित्रपटात सीतेच्या भूमिकेत आहे. काही दिवसांपूर्वी क्रिती सेनॉन हिचा या चित्रपटातील लूक पुढे आलाय.
*To a Mangalkaari Shurwaat!*
Seeking divine blessings at Vaishno Devi ?#Adipurush releases IN THEATRES on June 16, 2023 in 3D.#Adipurush #Prabhas @omraut #SaifAliKhan @kritisanon @mesunnysingh #BhushanKumar #KrishanKumar @vfxwaala @rajeshnair06 #ShivChanana pic.twitter.com/V0d3j3boL1— Othersidemeta (@TSeries) March 28, 2023
प्रभास याचा आदिपुरुष हा चित्रपट 16 जून 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जूनमध्ये अजय देवगण याचा मैदान हा चित्रपट देखील रिलीज होणार आहे. आदिपुरुष हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. 2 ऑक्टोबरला अयोध्येमध्ये आदिपुरुष चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला होता. मात्र टीझर पाहिल्यानंतर त्यावर नेटकऱ्यांकडून मोठी टिका करण्यात आली.
आदिपुरुष चित्रपटात प्रभास हा राम, सैफ अली खान हा रावण आणि क्रिती सेनॉन ही सीतेच्या भूमिकेत आहे. रामायणावर आधारित हा चित्रपट असून या चित्रपटात सैफ अली खान हा रावणाच्या भूमिकेत आहे. मात्र, सैफ अली खान यांच्याच भूमिकेमुळे काही दिवसांपूर्वी मोठा हंगामा हा बघायला मिळाला होता. इतकेच नाहीतर अनेकांनी थेट आदिपुरुष चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली होती.