Adipurush: ‘आदिपुरुष’च्या दिग्दर्शकाबद्दल रामानंद सागर यांच्या मुलाचं महत्त्वपूर्ण विधान

| Updated on: Oct 09, 2022 | 7:17 PM

'आदिपुरुष'च्या वादावर प्रेम सागर यांची प्रतिक्रिया; म्हणाले..

Adipurush: आदिपुरुषच्या दिग्दर्शकाबद्दल रामानंद सागर यांच्या मुलाचं महत्त्वपूर्ण विधान
'आदिपुरुष'च्या निर्मात्यांबाबत रामानंद सागर यांच्या मुलाने केलं मोठं विधान
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई- ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ (Adipurush) या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर त्याला नकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सनॉन यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटातील VFX आणि रामायण (Ramayan) या पौराणिक कथेतील पात्रांना दिलेला मॉडर्न लूक प्रेक्षकांना आवडला नाही. त्यावर बराच मोठा वाद सुरू आहे. दिग्दर्शक ओम राऊत यांनी त्यावर प्रतिक्रिया देत प्रेक्षकांना निराश करणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. त्यानंतर आता रामानंद सागर यांचे पुत्र प्रेम सागर यांनी आदिपुरुषच्या टीझरवर प्रतिक्रिया दिली आहे.

रामानंद सागर यांचं रामायण ही टेलिव्हिजन विश्वातील सर्वांत लोकप्रिय मालिका होती. या रामायण मालिकेतून प्रेरणा घेतल्याचं ओम राऊत यांनी नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं होतं. आता प्रेम सागर यांनी आदिपुरुषच्या टीझरबाबत त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत प्रेम सागर म्हणाले, “एखादी गोष्ट बनवण्यापासून तुम्ही कसं कोणाला रोखू शकता? वेळेनुसार धर्म बदलतो. ओम राऊत यांना जे ठीक वाटलं ते त्यांनी केलं.” त्याचप्रमाणे कोणाचीही बाजू घेण्यास त्यांनी नकार दिला.

हे सुद्धा वाचा

ओम राऊत यांनी त्यांच्या चित्रपटाला ‘रामायण’ असं म्हटलेलं नाही, त्यामुळे त्यांच्या दृष्टीकोनातून त्यांनी काहीही चुकीचं केलेलं नाही, असंही प्रेम सागर म्हणाले.

फक्त प्रेक्षकच नाही तर अयोध्येच्या मुख्य पुजाऱ्यांनीही आदिपुरुषच्या टीझरवर टीका केली आणि चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली. या चित्रपटात अभिनेता प्रभासने राम, सैफ अली खानने रावण आणि क्रिती सनॉनने सीतेची भूमिका साकारली आहे. टीझर पाहिल्यानंतर या भूमिकांबद्दल प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रावण हा अल्लाउद्दीन खिल्जीसारखा दिसतोय, अशी तक्रार नेटकऱ्यांनी केली.