मुंबई : शाहरुख खान हा त्याच्या पठाण या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाचे आतापर्यंत दोन गाणे रिलीज झाले आहेत. बेशर्म रंग या गाण्यामुळे चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. या चित्रपटामध्ये शाहरुख खानसोबत दीपिका पादुकोण देखील मुख्य भूमिकेत आहे. बेशर्म रंग या गाण्यामध्ये दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातल्यामुळे मोठा वाद सुरू आणि हेच पठाण चित्रपटाच्या वादाचे कारण आहे. बेशर्म रंग गाण्याला लोक मोठा प्रमाणात विरोध करत असतानाच 29 डिसेंबरला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने निर्मात्यांना चित्रपटामध्ये काही बदल करण्याचे आदेश दिले आहेत.
पठाण चित्रपटाच्याविरोधात सोशल मीडियावर मोठी मोहीम सुरू असून चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. अनेकांनी या चित्रपटाच्याविरोधात भूमिका घेतली आहे.
पठाण चित्रपटामुळे शाहरुख खान याला जीवे मारण्याच्या धमक्या देखील मिळत आहेत. अजूनही पठाण चित्रपटाचा ट्रेलर निर्मात्यांनी रिलीज केला नाहीये. शाहरुख खान याचे चाहते या ट्रेलरची वाट पाहात आहेत.
Advance booking in overseas has begun in Germany for #Pathaan & it’s madness all over !!
Berlin, Hamburg-Dammtor, Hamburg-Harburg, Offenbach are almost housefull.
25th Jan 2023 – The King of Overseas is coming y’all ?? pic.twitter.com/rYsJU30HVs
— AMAAN (@amaan0409) December 28, 2022
भारतामध्ये पठाण चित्रपटामुळे मोठा वाद सुरू असतानाच जर्मनीमध्ये चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता असल्याचे दिसत आहे. कारण पठाण चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाल्यानंतर काही तासांमध्ये सर्व तिकिटे विकली गेली आहेत.
पठाण चित्रपटामुळे वाद निर्माण झाल्याने याचा फायदा हा चित्रपटालाच होताना दिसत आहे. आता भारतामध्ये काय प्रतिसाद या चित्रपटाला मिळतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
पठाण या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खान हा तब्बल चार वर्षांनंतर पुनरागमन करत आहे. इतकेच नाहीतर पठाणनंतर लगेचच शाहरुख खान याचा डंकी हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.