मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) एकापाठोपाठ एक चित्रपटांचे शूटिंग पूर्ण करत आहे आणि त्याचे फोटोही चाहत्यांसोबत शेअर करत आहे. आता अलीकडेच, इन्स्टाग्रामवर तिचा एक फोटो शेअर करून कंगनाने सांगितले की, तिने ‘तेजस’चे शूटिंग सुरू केले आहे. फोटो पोस्ट करत तिने लिहिले, ‘आता मी माझ्या पुढच्या मिशनवर जात आहे.. आजपासून मिशन सुरू होत आहे.. माझा उत्साह आणखी वाढत आहे आणि याचे कारण आहे माझी अद्भुत टीम’.
या फोटोत कंगना हवाई दलाच्या गणवेशात दिसत आहे आणि यावेळी ती खूपच सुंदर दिसत आहे. या चित्रपटात कंगना भारतीय हवाई दलाच्या वैमानिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. कंगनाने याआधी अनेक भिन्न पात्रे साकारली आहेत पण पहिल्यांदा ती गणवेशात दिसली आहे. या चित्रपटाची कथा भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांना समर्पित करण्यात आली आहे.
प्रसिद्ध निर्माता रॉनी स्क्रूवालाच्या आरएसव्हीपी प्रॉडक्शनच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. तसेच, सर्वेश मेवाडा या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. काही दिवसांपूर्वी, त्याची पहिली झलक दाखवताना कंगनाने सांगितले की, ती या चित्रपटाचा एक भाग बनणार आहे. चित्रपटाच्या नाव आणि पोस्टरवरून असेही समजले आहे की, हा चित्रपट केवळ हवाई दलाच्या शूर वैमानिकांची कथा नाही, तर भारताच्या एकमेव स्वदेशी प्रगत लाइट कॉम्बॅट विमान तेजसची कथा आहे.
याआधी कंगनाने नुकतेच ‘धाकड’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. कंगना देखील या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहे. धाकडचे शूटिंग संपल्यानंतर तिने तिचे काही फोटो शेअर केले, जे चाहत्यांना खूप आवडले. मात्र, काही वापरकर्त्यांनी तिच्या बोल्ड चित्रांसाठी तिला ट्रोल केले.
कंगनाने धाकडचे शूटिंग पूर्ण केले आणि तेजसचे शूटिंग सुरू केले, तर दुसरीकडे तिचा ‘थलायवी’ चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहे. या चित्रपटात ती तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकारत आहे. चाहत्यांना चित्रपटाचा ट्रेलर आवडला असून, आता प्रत्येकजण या चित्रपटाच्या रिलीजबद्दल उत्सुक आहे.
यासोबतच कंगना आणीबाणीवर आधारित चित्रपटाचीही तयारी करत आहे, ज्यात ती देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. तिने याच्या तयारीचीही काही छायाचित्रेही शेअर केली होती. चाहते कंगनाच्या या सर्व चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत.
मांडव सजलाय अंगणदारी, नटून थटून तयार नवरदेवाची स्वारी, स्वीटूच्या ओमच्या वेडिंग लूक पाहिलात का?
‘मला चार लोकांचे आभार मानायचे आहेत’, करण बूलानीची लग्नानंतर रियासाठी खास पोस्ट