‘केआरके’ची सोशल मीडियावर फक्त एक पोस्ट आणि पठाण चित्रपटाविरोधात बॉयकॉट ट्रेंड सुरू

| Updated on: Nov 16, 2022 | 4:17 PM

विशेष म्हणजे ही टीका बऱ्याच वेळा अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन देखील केली जाते.

केआरकेची सोशल मीडियावर फक्त एक पोस्ट आणि पठाण चित्रपटाविरोधात बॉयकॉट ट्रेंड सुरू
Follow us on

मुंबई : कमाल आर खान आणि वाद हे समीकरण कायमच सुरू असते. केआरकेच्या निशाण्यावर बाॅलिवूडचे चित्रपट आणि अभिनेते असतात. सलमान खानपासून ते अक्षय कुमारपर्यंत सर्वांवरच केआरके टीका करतो. विशेष म्हणजे ही टीका बऱ्याच वेळा अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन देखील केली जाते. याचे परिणाम म्हणजे केआरकेवर गुन्हे देखील दाखल होतात. मात्र, काही दिवसांपूर्वी भारतामध्ये आल्यानंतर सलमान खान आणि शाहरुख खानची माफी मागत पठाण चित्रपटाला सपोर्ट करणार असल्याची एक पोस्ट केआरकेने सोशल मीडियावर शेअर केली होती.

केआरकेची ही शाहरुख खान आणि सलमान खानला माफी मागितलेली पोस्ट पाहून अनेकांना वाटले की, खरोखरच केआरके सुधरला आहे. अनेकांनी या पोस्ट पाहून आर्श्चय देखील व्यक्त केले. मात्र, केआरकेने आता परत एकदा शाहरुख खानवर टीका करत त्याच्या पठाण चित्रपटाविषयी मोठे विधान केले आहे.

केआरकेने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मी शाहरुखशी सहमत आहे की, त्याचा पठाण हा चित्रपट पाकिस्तान आणि परदेशात हिट होईल. केआरकेचे म्हणणे आहे की, शाहरुखचा पठाण हा चित्रपट फ्लाॅप होईल. आता केआरकेच्या या पोस्टवर युजर्स मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

केआरके गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. केआरके सोशल मीडियावर बाॅलिवूड चित्रपटांच्या विरोधात कायमच पोस्ट शेअर करतो. बऱ्याच वेळा चाहते केआरकेलाही सोशल मीडियावर टार्गेट करत त्याच्या पोस्टवर कमेंट करतात.

केआरके याने शाहरुख खानच्या विरोधात केलेल्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत शाहरुख खानच्या पठाण चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केलीये. गेल्या काही दिवसांपासून शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे.