मुंबई : पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येला काही महिने उलटले आहेत, तोवरच अजून एका पंजाबी गायकाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीये. खतरनाक बाब म्हणजे यासाठी अल्पवयीन मुलांना तयार करून ट्रेनिंग देणे देखील सुरू असल्याचे सांगितले जातंय. सिद्धू मुसेवालाच्या मारेकऱ्यांच्या मुसक्या पंजाब पोलिसांनी आवळल्या आहेत. मात्र, मुख्य आरोपी अजूनही पोलिसांच्या ताब्यात नाहीये. यामध्येच आता दुसऱ्या एका पंजाबी गायकाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीये. यामुळे पंजाबमध्ये नेमके काय सुरू आहे? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
प्रसिद्ध पंजाबी गायक बब्बू मान याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यामागे पंजाबमधील गँग बंबीहाचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे. आता पोलिसांनी बब्बू मानच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ केली आहे.
सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर आता गायक बब्बू मानला धमकी मिळाल्याने भीतीचे वातावरण बघायला मिळत आहे. जीवे मारण्याची धमकी बब्बू मानला फोनवरून देण्यात आली आहे.
धमकीचा फोन आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी आपला तपास हा सुरू केला असून बब्बू मानचा सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मात्र, यावर अजून कोणीही काहीही भाष्य केले नाहीये.
अशी एक माहिती मिळत आहे की, बब्बू मानला जीवे मारण्याचा फोन आल्यानंतर त्याने पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आता बब्बू मानच्या घराबाहेर बंदोबस्त वाढवला आहे.