मुंबई : शाहरुख खान याने पठाण (Pathaan) चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. विशेष म्हणजे शाहरुख खान याचा हा चित्रपट हिट ठरला. या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाये. विशेष बाब म्हणजे फक्त भारतामध्येच नव्हे तर विदेशामध्येही पठाण चित्रपटाने धमाकेदार कामगिरी केलीये. एकीकडे बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जात होते, तर दुसरीकडे साऊथचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर ताबडतोब कमाई करत होते. यामध्येच शाहरुख खान याचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित पठाण चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे पठाण चित्रपटाचे जास्त प्रमोशन करण्यावरही शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने भर दिला नाही. कोणत्याच कार्यक्रमामध्ये पठाण चित्रपटाचे प्रमोशन करतानाही शाहरुख खान कधी दिसला नाही. फक्त चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर शाहरुख खान हा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात होता. विशेष म्हणजे एका सेशनच्या माध्यमातून तो आपल्या चाहत्यांच्या प्रश्नाची उत्तरे देताना देखील दिसला. चित्रपट रिलीज झाल्यानंतर अजून तो आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावर गप्पा मारतो.
शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाने ओनपिंग डेलाच मोठा धमाका करत काही रेकाॅर्ड आपल्या नावावर केले होते. अजूनही चित्रपटाचा बाॅक्स आॅफिसवर जलवा बघायला मिळतोय. या चित्रपटाने हिंदी भाषेमध्येही जोरदार कमाई केलीये.
पठाण चित्रपटातील बेशर्म रंग गाणे रिलीज झाल्यानंतर मोठ्या वादाला तोंड फुटले होते. बेशर्म रंग गाण्यामध्ये दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने वाद निर्माण झाला होता. या दरम्यान अनेकांनी थेट चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणीच करू टाकली होती.
सोशल मीडियावरही चित्रपटाच्या विरोधात वातावरण बघायला मिळत होते. देशातील अनेक ठिकाणी मोठी आंदोलने चित्रपटाच्या विरोधात करण्यात आली. इतका मोठा वाद सुरू असताना शाहरुख खान यावर काहीच भाष्य करताना दिसला नाही. या वादात शाहरुख खान आणि चित्रपटाच्या टिमने शांत राहणे पसंत केले.
पठाण हा चित्रपट २५ जानेवारी रोजी रिलीज झाला. आता या चित्रपटाला रिलीज होऊन जवळपास पंधरा दिवस होत असताना शाहरुख खान याची पत्नी गौरी खान हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.
गौरी खान हिने हा व्हिडीओ नुकताच इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. विशेष बाब म्हणजे या व्हिडीओतील एका फोटोमध्ये गौरी खान हिने थेट भगव्या रंगाचा ड्रेस घातल्याचे दिसत आहे. या व्हिडीओवर कमेंट करत एका युजर्सने लिहिले की, शाहरुख खान याच्या क्वीनने थेट उत्तर दिले आहे. दुसऱ्याने लिहिले की, भाभी भगवा बवाल…आता गौरी खान हिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.