सतीश कौशिक यांच्या जाण्याने बाॅलिवूड विश्वावर शोककळा, सलमान खान याच्यापासून अक्षय कुमारपर्यंत या बाॅलिवूड स्टारने

| Updated on: Mar 09, 2023 | 4:13 PM

सतीश कौशिक याच्या जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर बाॅलिवूडमधील काही स्टारने सतीश कौशिक यांच्या निधनानंतर पोस्ट शेअर केल्या आहेत. या पोस्टमध्ये सर्वांनी जुन्या आठवणी ताज्या केल्या आहेत.

सतीश कौशिक यांच्या जाण्याने बाॅलिवूड विश्वावर शोककळा, सलमान खान याच्यापासून अक्षय कुमारपर्यंत या बाॅलिवूड स्टारने
Follow us on

मुंबई : अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक म्हणून सतीश कौशिक (Satish Kaushik) यांनी एक खास ओळख निर्माण केली. अचानक सतीश कौशिक यांनी जगाचा निरोप घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. सलमान खान याच्यापासून अनिल कपूर (Anil Kapoor) यांच्यासाठी सतीश कौशिक हे लक्की ठरले. आता सतीश कौशिक यांच्या निधनानंतर अनेक बाॅलिवूड (Bollywood) अभिनेते आणि अभिनेत्रींनी सतीश कौशिक यांच्यासाठी पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केले आहे. सतीश कौशिक यांचा जन्म 13 एप्रिल 1956 रोजी हरियाणात झाला होता. त्यांनी आपल्या करिअरमधील अनेक चित्रपटांमध्ये हिट भूमिका केल्या आहेत. 100 हून अधिक चित्रपटांमध्ये सतीश कौशिक यांनी काम केले.

अनुपम खेर यांनी सतीश कौशिक यांच्या निधनाची बातमी शेअर केली. अनुपम खेर यांच्या पोस्टनंतर अजय देवगण याने एक भावनिक पोस्ट शेअर करत लिहिले की, सतीश कौशिक यांच्या निधनाच्या बातमीने उठलो…आम्ही जेव्हा कधी भेटायचो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हास्य असायचे. RIP सतीश जी….आता अजय देवगण याची ही पोस्ट व्हायरल होत आहे.

अक्षय कुमार आणि सतीश कौशिक यांनी चित्रपटामध्ये सोबत काम केले होते. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अक्षय कुमार म्हणाला की, चंदा मामा गेले… त्यांच्या जाण्याने मला दु:ख झाले आहे…मला खात्री आहे की ते स्वर्गातही सर्वांना हसवतील…सलमान खान याने देखील एक पोस्ट शेअर केली आहे.

सलमान खान म्हणाला की, नेहमी त्याच्यावर प्रेम केले, त्याची काळजी घेतली आणि त्याचा आदर केला…त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि कुटुंब आणि प्रियजनांना शक्ती मिळो… RIP सतीश जी…प्रियांका चोप्रा हिने लिहिले की, ओम शांति सतीश सर..तुमची खूप जास्त आठवण येईल…आमच्या आयुष्यात खूप जास्त हास्य दिल्याबद्दल धन्यवाद…

मनोज बाजपेयी, राकेश रोशन, अभिषेक बच्चन यांनी देखील सतीश कौशिक यांना श्रद्धांजली वाहत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या. आता या स्टारच्या पोस्टवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. सर्वजण सतीश कौशिक यांच्यासोबतच्या आठवणी ताज्या करताना दिसत आहेत. चाहत्यांनी देखील सतीश कौशिक यांना श्रद्धांजली वाहिली.