मुंबई : बाॅलिवूड अभिनेता अजय देवगणचा दृश्यम 2 हा चित्रपट सध्या बाॅक्स ऑफिसवर धमाका करत आहे. कोरोनानंतर बाॅलिवूडचे चित्रपट हे बाॅक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकत नव्हते. यामध्येच आता अजयच्या दृश्यम 2 ने चांगली कमाई करत बाॅलिवूडला एकप्रकारे मोठा दिलासाच दिला आहे. अजय देवगण आणि तब्बूच्या जोडीला प्रेक्षकांकडून प्रेम मिळत आहे. दृश्यमच्या पहिल्या भागाने देखील मोठी कमाई केली होती. या चित्रपटाची स्टोरी अत्यंत खास आहे.
बाॅक्स ऑफिसवर चित्रपट धमाकेदार कमाई करत असतानाच आता अजय देवगण हा थेट काशी विश्वनाथ मंदिरामध्ये पोहचला आहे. येथे मंदिरात जाऊन अजयने दर्शन घेतले. अजयचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अजयने काशी विश्वनाथ मंदिरात दर्शन घेतानाचे काही फोटो हे त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. दृश्यम 2 या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये सुरूवातीपासूनच प्रचंड क्रेझ होते.
2017 मध्ये दृश्यम 2 चा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर प्रेक्षक दृश्यम 2 ची वाट पाहात होते. दृश्यम 2 रिलीज होण्याच्या काही दिवसांपूर्वीच कतरिना कैफचा फोन भूत, जान्हवी कपूरचा मिली आणि सोनाक्षी सिन्हाचा डबल XL हे चित्रपट रिलीज झाले होते.
या तिन्ही चित्रपटांना बाॅक्स आॅफिसवर धमाका करण्यात यश मिळाले नाही. यामुळे दृश्यम 2 चे काय होणार ही चर्चा रंगली होती. परंतू पहिल्याच दिवसापासून या चित्रपटाला प्रेक्षकांचे चांगले प्रेम मिळाले आहे.
अजय देवगणचे काशी विश्वनाथ मंदिरातील फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. चाहते अजयच्या या फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. अजयने काशी विश्वनाथ मंदिरातील फोटो शेअर करताना लिहिले की, हर हर महादेव…