मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या मिशन मजनू या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच मिशन मजनू (Mission Majnu) हा चित्रपट रिलीज झालाय. मात्र, या चित्रपटाला पाकिस्तानमधील लोक प्रचंड ट्रोल करताना दिसत आहेत. इतकेच नाहीतर अनेकांनी हा चित्रपट (Movie) पाहिल्यानंतर सिद्धार्थ मल्होत्रा यालाही टार्गेट करण्यास सुरूवात केलीये. सिद्धार्थ मल्होत्रा हा मिशन मजनू या चित्रपटामध्ये एका रॉ एजंटच्या भूमिकेत आहे. मिशन मजनू या चित्रपटामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा हटके स्टाईलमध्ये दिसतोय. यापूर्वी अशा लूकमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा कधीच दिसला नव्हता. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा हा रॉ एजंट असून एका आॅपरेशनसाठी त्याला पाकिस्तानमध्ये पाठवण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा याने एका पाकिस्तानी मुलीसोबत निकाह केल्याचे दाखवण्यात आले आहे.
सिद्धार्थ मल्होत्रा याच्यासोबतच मिशन मजनू या चित्रपटामध्ये साऊथची स्टार अर्थात रश्मिका मंदाना देखील मुख्य भूमिकेत आहे. सिद्धार्थ मल्होत्रा याच्या पत्नीच्या भूमिकेत रश्मिकाने देखील जबरदस्त अभिनय केलाय.
मिशन मजनू या चित्रपटावर पाकिस्तानमध्ये टीका होत असतानाच एका पाकिस्तानी अभिनेत्याने या वादामध्ये आता उडी घेतलीये. इतकीच नाहीतर त्याने थेट बाॅलिवूडलाच चार गोष्टी सुनावल्या आहेत.
अदनान सिद्धकी असे पाकिस्तानी अभिनेत्याचे नाव आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अदनान सिद्धकी याने म्हटले की, मिशन मजनू हा चित्रपट अत्यंत खराब असून यामध्ये अजिबात वस्तुस्थिती ही दाखवण्यात आली नाहीये.
पुढे अदनान सिद्धकी याने लिहिले की, खरोखरच खूपच जास्त चुकीचे आहे…याचे काही उत्तर बाॅलिवूडकडे आहे का? मला वाटते की, तुमच्याकडे इतका जास्त पैसा आहे तर तुम्ही चांगले रिसर्चर का करत नाहीत? अदनान सिद्धकी याने बाॅलिवूडच्या चित्रपटामध्ये माधुरी दीक्षित हिच्यासोबत काम केले आहे.
इतकेच नाहीतर अदनान सिद्धकी याने थेट सिद्धार्थ मल्होत्रा याची देखील खिल्ली उडवली आहे. अदनान सिद्धकी म्हणाला, आम्ही जाळीच्या टोप्या, सुरमा, ताबीज घालत नाहीत…आम्ही जनाब तुमचा मिजाज कसा आहे हे देखील विचारत नाहीत.
आम्ही आदाब करत फिरत नाहीत…पुढे अदनान सिद्धकी याने चित्रपटाला घटिया असल्याचे देखील म्हटले. आता अदनान सिद्धकी याची पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. पाकिस्तानमध्ये सुरूवातीपासूनच मिशन मजनू या चित्रपटाला ट्रोल केले जात होते.