मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि सलमान खान हे काही वर्षांपूर्वी त्यांच्या रिलेशनशिपमुळे प्रचंड चर्चेत होते. 1997 मध्ये ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांच्या लव्ह स्टोरीला (Love story) सुरूवात झाली होती. पहिल्यांदा या दोघांनी हम दिल दे चुके सनम या चित्रपटामध्ये काम केले. विशेष म्हणजे चित्रपटाच्या सेटवरच यांच्या लव्ह स्टोरीला सुरूवात झाल्याचे सांगितले जाते. मात्र, त्यावेळी कोणीच अजिबात विचार केला नसेल की, यांच्या लव्ह स्टोरीचा अंत हा इतका जास्त वाईट होईल. ऐश्वर्या राय आणि सलमान खान (Salman Khan) हे दोघे बरेच वर्ष एकमेकांना डेट करत होते. बऱ्याच वेळा यांच्या लग्नाच्या चर्चा देखील रंगल्या होत्या.
ऐश्वर्या राय हिने 2002 मध्ये एक मुलाखत देत सलमान खान याच्यावर अनेक गंभीर आरोप केले. सलमान खान याच्यावर ऐश्वर्या राय हिने केलेले आरोप ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. या मुलाखतीमध्ये ऐश्वर्या राय हिने थेट म्हटले होते की, सलमान खान हा आपल्याला मारहाण करतो. एकदा नाही तर त्याने आपल्याला बऱ्याच वेळा मारहाण केलीये.
सलमान खान याला वाटते की, माझे एखाद्या बाॅलिवूड स्टारसोबत अफेअर सुरू आहे. जर मी सलमान खान याचा एक फोनही उचलला नाही की, तो स्वत: ला देखील दुखापत करून घेतो. बऱ्याच वेळा सलमान खान याने मला मारहाण केलीये. बाॅलिवूडमधील अनेक कलाकारांसोबत त्याने माझे नाव जोडले असल्याचा देखील आरोप ऐश्वर्या राय हिने केला होता.
ऐश्वर्या राय हिने म्हटले होते की, एकवेळ माझ्या घराबाहेर सलमान खान याने मोठा हंगामा केला होता. त्यावेळी तो दारू पिऊन माझ्या घराबाहेर हंगामा करत होता. त्यानंतर माझ्या वडिलांनी थेट पोलिसांमध्ये सलमान खान याच्या विरोधात तक्रार दाखल केली. माझे नशीब चांगले की, सलमान खान याने मला मारहाण करूनही माझ्या शरीरावर डाग पडले नाहीत.
ऐश्वर्या राय हिने सांगितले की, माझे आणि सलमान खानचे ब्रेकअप झाल्यानंतरही तो मला सतत काॅल करत असत. इतकेच नाही तर फक्त फोनच नाही तर त्याने मला फोनवर अनेकदा चुकीचे देखील बोलला आहे. बऱ्याच वेळा सलमान खान हा मला मारहाण करायचा आणि मी काही घडले नसल्याचे दाखवत चित्रपटाच्या सेटवर जायचे.
सलमान खान याने यानंतर एक मुलाखत दिली होती. ऐश्वर्या राय हिने केलेले सर्व आरोप खोटे असल्याचे देखील सलमान खान याने म्हटले होते. सलमान खान म्हणाला होता की, मी काही झाले तर स्वत:ला इजा करून घेऊ शकतो. मात्र, मी इतर कोणाली मारत नाही. ऐश्वर्या राय हिने केलेले आरोप खोटे असल्याचे सलमान खान याने मह्टले होते.