मुंबई : बाॅलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. अजय देवगण याचा भोला हा चित्रपट 30 तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना अजय देवगण हा दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच अजय देवगण याने सोशल मीडियावर (Social media) चाहत्यांसाठी एक खास सेशन ठेवले होते. या सेशनमध्ये अजय देवगण हा चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तरे देताना दिसला. यावेळी अजय देवगण याला थेट एका चाहत्याने मुलगा युग याला बाॅलिवूडमध्ये कधी लाॅन्च करणार हा प्रश्न विचारला. यावेळी धमाकेदार पध्दतीने उत्तर देताना अजय देवगण हा दिसला.
शाहरूख खान हा देखील त्याचा पठाण चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर चाहत्यांसाठी अशा सेशनचे आयोजन करताना दिसला होता. यामध्ये शाहरूख खान हा देखील आपल्या चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तरे देत होता. विशेष म्हणजे शाहरूख खान याने अजिबात कोणत्याही शोमध्ये किंवा शहरामध्ये जाऊन पठाण चित्रपटाचे प्रमोशन केले नाही.
पठाण चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर तो फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात होता. अजय देवगण देखील शाहरूख खान याची काॅपी करताना दिसत आहे. अजय देवगण याच्या भोला चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये क्रेझ बघायला मिळत आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.
Aaj raat 9:30 baje, #SonyEntertainmentTelevision par #TheKapilSharmaShow mein, Kappu karenge koshish poori, kyunki Tabu ji ke saath flirt karna hai zaroori!??@kapilsharmaK9 #AjayDevgn #Tabu#TKSS pic.twitter.com/K3MsJofwo7
— sonytv (@SonyTV) March 26, 2023
अजय देवगण नुकताच भोला चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी कपिल शर्मा याच्या शोमध्ये पोहचला होता. अजय देवगण आणि चित्रपटाची टीम कपिल शर्मा याच्या शोमध्ये धमाका करताना दिसली. यावेळी अजय देवगण हा थेट कपिल शर्माला म्हटला की, अंघोळ करून आला का? अजय देवगण याचे हे बोलणे ऐकून कपिल शर्मा हसायला लागला.
कपिल शर्मा म्हणाला की, अजय देवगण कपिल शर्मा याच्या सेटवर येणार कळताच मीडियावाले मला विचारत होते की, अजय देवगण सरांसोबत तुमचे नेमके काय बोलणे झाले. मी त्यांना म्हणालो की, फक्त चीत-चीत झाली बोलणे काहीच झाले नाही, कारण अजय देवगण सर काहीच बोलत नाहीत….कपिल शर्मा याचे हे बोलणे ऐकून अजय देवगण हसायला लागला.
गेल्या काही दिवसांपासून अजय देवगण याचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच अजय देवगण याचा दृश्यम 2 हा चित्रपट रिलीज झाला. हा चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर धमाकेदार कामगिरी केलीये. या चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड तोडले आहेत. ज्यावेळी बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जात होते, त्यावेळी अजय देवगण याच्या दृश्यम 2 ने तूफान अशी कामगिरी केलीये.