मुंबई : बाॅलिवूड अभिनेता अजय देवगण हा त्याच्या आगामी भोला या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे. भोला हा अजय देवगण (Ajay Devgn) याचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. चाहते गेल्या कित्येक दिवसांपासून या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. अजय देवगण याचा भोला चित्रपटातील लूक पुढे आल्यापासून चाहत्यांमध्ये या चित्रपटाची क्रेझ बघायला मिळतंय. अजय देवगण याचा भोला हा चित्रपट (Movie) 30 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. काही दिवसांपूर्वी शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा पठाण हा चित्रपट रिलीज झाला आणि या चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड आपल्या नावावर नोंदवले.
मुळात म्हणजे गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे चित्रपट हे बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जाताना दिसत आहेत. मात्र, याला पठाण आणि अजय देवगण याचा दृश्यम 2 हे अपवाद ठरले. दृश्यम 2 प्रमाणेच अजय देवगण याचा भोलाही बाॅक्स आॅफिसवर धमाका करेल असे सांगितले जात आहे. नुकताच अजय देवगण याने ट्विटरवर आस्क भोला सेशन ठेवले होते.
Only love for ‘PATHAAN’ @iamsrk https://t.co/WGqU3ZyblR
— Ajay Devgn (@ajaydevgn) March 14, 2023
आस्क भोला सेशनमध्ये अजय देवगण चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तरे देताना दिसला. विशेष म्हणजे शाहरूख खान यानेही पठाण चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर अशाच प्रकारच्या सेशनचे आयोजन केले होते. सेशनमधून शाहरूख खान हा चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तरे देताना दिसला. आता तेच अजय देवगण करत आहे.
यावेळी एका चाहत्याने अजय देवगण याला म्हटले की, शाहरूख खान यांच्यासाठी एक शब्द…यावर अत्यंत खास उत्तर देताना अजय देवगण हा दिसला. अजय देवगण याने लिहिले की, Only love for PATHAAN….आता अजय देवगण याची ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. शाहरूख खान याच्या चाहत्यांना अजय देवगण याचा हा रिप्लाय प्रचंड आवडलाय. यावेळी अनेक चाहत्यांनी अजय देवगण याला भोला चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Maine bhi aisa hi kuch suna hai ? https://t.co/M65yYa9n45
— Ajay Devgn (@ajaydevgn) March 14, 2023
काही दिवसांपूर्वी अजय देवगण याने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये अजय देवगण हा गाडीवर फिरताना दिसला आणि काही चाहते हे त्याच्या मागे धावताना दिसले होते. अजय देवगण हा कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतो. आता तर भोला चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर तो सेशनच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहे.