मुंबई : गायक मिका सिंगने (Mika Singh) स्वयंवरमध्ये आपली लाईफ पार्टनर म्हणून अभिनेत्री आकांक्षा पुरीला निवडले होते. हे दोघे लग्न कधी करणार याकडे चाहत्यांचा नजरा लागलेल्या असताना आकांक्षा पुरीने केलेले भाष्य ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. यापूर्वी मिका सिंगसोबत लग्न (Marriage) कधी करणार या प्रश्नांवर आकांक्षा उडवा उडवीचे उत्तरे (Answers) देताना दिसली होती. खरोखरच मिका आणि आकांक्षा लग्न करणार का? हा प्रश्न चाहत्यांसमोर असतानाच आता यावर जरा स्पष्ट बोलताना शेवटी आकांक्षा दिसली.
मिका सिंगचे स्वयंवर होऊन आता तब्बल तीन महिने उलटले आहेत. मात्र, आकांक्षा आणि मिकाच्या लग्नाविषयी काहीच अपडेट मिळत नव्हते. ईटाईम्सने मिकासोबत लग्न कधी करणार हा प्रश्न आकांक्षाला विचारला असता, आकांक्षा म्हणाली की, मी शोमध्ये सांगितले होते मी आणि मिका खूप चांगले जुने मित्र आहोत. आम्ही कपल नाहीयेत, पुढेही आम्हाला आमची मैत्री टिकवायची आहे.
पुढे आकांक्षा म्हणाली की, स्वयंवरमध्ये मी माझा लाईफ पार्टनर शोधण्यासाठीच आले होते पण स्वयंवरनंतर मी आणि मिकाने ऐकमेकांना बराच वेळ दिला. आमची मैत्री खूप जुनी आहे. पण आम्ही मित्रच छान आहोत. शोनंतर आमच्यामध्ये काहीच बदलले नाही हे विशेष आहे. आम्ही अजूनही जुनेच मित्र आहोत. कायमच ऐकमेकांचा आदर करतो. यामुळे आता हे स्पष्ट झाले आहे की, मिका सिंग आणि आकांक्षा पुरी हे लग्न करणार नाहीयेत.