Akshay Kumar | मोठा निर्णय घेत अक्षय कुमार याने सततच्या ट्रोलिंगवर दिले सडेतोड उत्तर
अक्षय कुमार याच्या चित्रपटाला रिलीज होऊन दोन दिवस झाले असूनही चित्रपटाच्या कामगिरीमध्ये काही विशेष सुधारणा झाली नाहीये. दुसरीकडे शाहरूख खान याचा पठाण हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर अजूनही चांगली कमाई करताना दिसत आहे.
1 / 5
बाॅलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार हा सध्या त्याच्या सेल्फी या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अक्षय कुमार याचा सेल्फी हा चित्रपट शुक्रवारी रिलीज झालाय. मात्र, या चित्रपटाला ओपनिंग डेला धमाका करण्यात यश मिळाले नाहीये. विशेष म्हणजे 2023 मधील अक्षय कुमार याचा सेल्फी हा रिलीज होणारा पहिला चित्रपट आहे. अक्षय कुमार याच्या या चित्रपटाकडून चाहत्यांसह निर्मात्यांनाही मोठ्या अपेक्षा होत्या.
2 / 5
अक्षय कुमार याच्या चित्रपटाला रिलीज होऊन दोन दिवस झाले असूनही चित्रपटाच्या कामगिरीमध्ये काही विशेष सुधारणा झाली नाहीये. दुसरीकडे शाहरूख खान याचा पठाण हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर अजूनही चांगली कमाई करताना दिसत आहे.
3 / 5
4 / 5
नुकताच आजतकच्या एका मुलाखतीमध्ये बोलताना अक्षय कुमार याने काही मोठ्या गोष्टींवर भाष्य केले आहे, ज्यामुळे सध्या तो चर्चेत आहे. कॅनडा कुमारच्या टिकेवर देखील त्याने भाष्य केले. अक्षय कुमार म्हणाला की, लोक मला सतत कॅनडा कुमार म्हणून टार्गेट करतात.
5 / 5
अक्षय म्हणाला की, मी लवकरच कॅनेडियन नागरिकत्व सोडणार आहे. मी त्याच्यासाठी अप्लाय देखील केलाय. माझे एका मागून एक असे तब्बल पंधरा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेले होते. यामुळेच मी कॅनडामध्ये राहण्यास गेलो होतो. पुढे अक्षय कुमार म्हणाला की, माझ्यासाठी भारत देश सर्वस्व असून मी पासपोर्ट बदलण्यासाठी अर्ज देखील केला आहे. म्हणजेच सततच्या कॅनडा कुमारच्या टिकेवर अखेर अक्षय कुमार याने मोठा निर्णय घेतला आहे.