Ram Setu: अक्षय कुमारचा ‘राम सेतू’ वादाच्या भोवऱ्यात; सुब्रमण्यम स्वामी यांनी बजावली कायदेशीर नोटीस

| Updated on: Aug 28, 2022 | 3:51 PM

अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'सम्राट पृथ्वीराज' आणि 'रक्षाबंधन' हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटले. आता त्याचा आगामी चित्रपट 'राम सेतू'सुद्धा (Ram Setu) वादाच्या भोवऱ्याच अडकला आहे.

Ram Setu: अक्षय कुमारचा राम सेतू वादाच्या भोवऱ्यात; सुब्रमण्यम स्वामी यांनी बजावली कायदेशीर नोटीस
Ram Setu: अक्षय कुमारचा 'राम सेतू' वादाच्या भोवऱ्यात
Image Credit source: Twitter
Follow us on

सध्या बॉलिवूडचे चित्रपट हे नेटकऱ्यांच्या निशाण्यावरच आहेत. एकीकडे बॉक्स ऑफिसवर मोठमोठ्या कलाकारांचे बॉलिवूड चित्रपट फ्लॉप होत आहेत तर दुसरीकडे सोशल मीडियावर या चित्रपटांविरोधात बॉयकॉटचा ट्रेंड (Boycott Trend) सुरू आहे. बॉयकॉटच्या ट्रेंडचा परिणाम बॉक्स ऑफिस कलेक्शनवरही होत असल्याने चित्रपट निर्माते आणि कलाकार चिंतेत आहेत. अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘सम्राट पृथ्वीराज’ आणि ‘रक्षाबंधन’ हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटले. आता त्याचा आगामी चित्रपट ‘राम सेतू’सुद्धा (Ram Setu) वादाच्या भोवऱ्याच अडकला आहे.

भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी अक्षय कुमारसह राम सेतू या चित्रपटाशी संबंधित इतर आठ जणांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. ‘राम सेतू’ चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सुब्रमण्यम स्वामी यांच्या याचिकेवरील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत वापरण्यात आली आहे. यावरूनच ते संतापले आहेत. सुब्रमण्यम स्वामी यांनी यापूर्वीसुद्धा अक्षय कुमारवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता.

हे सुद्धा वाचा

सुब्रमण्यम स्वामी यांचं ट्विट-

सुब्रमण्यम स्वामी यांनी नुकत्याच केलेल्या एका ट्विटमध्ये लिहिलं, ‘मुंबई चित्रपटसृष्टीतील लोकांना खोट्या आणि चुकीच्या पद्धतीने गोष्टी दाखवण्याची सवय आहे. त्यामुळे त्यांना बौद्धिक संपदा अधिकारांबद्दल माहिती देण्यासाठी मी अक्षय कुमार आणि राम सेतूशी संबंधित आठ लोकांविरुद्ध वकील सत्य सभरवाल यांच्यामार्फत कायदेशीर नोटीस पाठवली आहे.’

राम सेतू या चित्रपटात अक्षय कुमारने एका पुरातत्व शास्त्रज्ञाची भूमिका साकारली आहे. राम सेतू नैसर्गिक आहे की मानवनिर्मित, याचा तपास तो चित्रपटात करत असतो. यामध्ये अक्षयसोबत जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा यांच्यादेखील भूमिका आहेत. अभिषेक शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट 24 ऑक्टोबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.