मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांनी 14 एप्रिल 2022 रोजी अचानक लग्न करत सर्वांना मोठा धक्का दिला. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी एकमेकांना तब्बल पाच वर्ष डेट केले आणि मग लग्नाचा निर्णय घेतला. आलिया भट्ट हिने 6 नोव्हेंबर रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला. आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर यांनी त्यांच्या मुलीचे नाव राहा असे ठेवले. आलिया भट्ट हिने सोशल मीडियावर (Social media) खास पोस्ट शेअर करत मुलीचे नाव आणि तिच्या नावाचा अर्थही सांगून टाकला. मात्र, अजूनही आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी त्यांच्या मुलीची झलक चाहत्यांना दाखवली नाही. गेल्या काही दिवसांपासून आलिया ही तिच्या फिटनेसकडे लक्ष देताना दिसत आहे.
नुकताच आलिया भट्ट हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये आलिया ही रणबीर कपूर याच्याबद्दल सांगताना दिसत आहे. आलिया भट्ट म्हणाली की, रणबीर कपूर हा अत्यंत शांत आणि साधू टाईप माणूस आहे. काहीही झाले तरीही रणबीर हा कायम शांत असतो. मी चिडलेली देखील त्याला अजिबात आवडत नाही.
कोणतीही परिस्थिती असो रणबीर हा कायमच शांत असतो. मात्र, ज्यावेळी मला राग येतो त्यावेळी माझा आवाज वाढतो आणि मी जोरात बोलायला किंवा चिडचिड करायला सुरूवात करते. मात्र, माझी ही सवय रणबीर कपूर याला अजिबातच आवडत नाही. काही दिवसांपूर्वी रणबीर कपूर याचा तू झूठी में मक्कार हा चित्रपट रिलीज झालाय.
विशेष म्हणजे तू झूठी में मक्कार या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना रणबीर कपूर हा दिसला होता. चित्रपटाच्या प्रमोशन वेळी रणबीर कपूर आपल्या खासगी आयुष्याबद्दल सांगताना देखील दिसला होता. रणबीर कपूर म्हणाला होती की, मी आलिया आणि माझी मुलगी राहा हिला प्रचंड मिस करतोय…आलिया आणि राहा मुंबईत नसून आलिया तिच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी कश्मीरला गेलीये.
काही दिवसांपूर्वीच आलिया भट्ट ही तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लंडन येथे पोहचली होती. यावेळी आलिया भट्ट हिची आई, बहीण, रणबीर कपूर आणि काही मित्र देखील त्यांच्यासोबत होते. आलिया भट्ट हिने सोशल मीडियावर तिच्या वाढदिवसाचे अनेक फोटो हे शेअर केले होते. आलिया भट्ट गेल्या काही दिवसांपासून सतत तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे.