मुंबई : 6 नोव्हेंबरला अभिनेत्री आलिया भट्ट हिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. आलिया आणि रणबीर कपूरला मुलगी झाल्याचे समजताच त्यांचे चाहते मुलीची झलक पाहण्यास उत्सुक आहेत. मात्र, अजूनही रणबीर किंवा आलिया यांनी मुलीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला नाहीये. आलिया मुलीचे नाव काय ठेवणार यावर जोरदार चर्चा रंगताना दिसत होती. इतकेच नाही तर काही चाहते यांना मुलीची नावे देखील सुचवत होते. आता फायनली आलियाने तिच्या मुलीचे नाव ठेवले असून याची माहिती सोशल मीडियावर शेअर केलीये.
आलिया भट्टने इंस्टाग्रामवर एक नवीन पोस्ट शेअर केलीये, या पोस्टमध्ये आलियाने मुलीचे नाव जाहिर केले असून सोबतच तिच्या नावाचा अर्थही सांगून टाकला आहे. आलिया आणि रणबीर यांनी त्यांच्या मुलीचे नाव स्पेशल असे ठेवले आहे.
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या मुलीचे नाव राहा असे ठेवले आहे. विशेष म्हणजे हे नाव राहाच्या आजीने ठेवले असल्याचे देखील आलियाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
आलियाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ज्याचे अनेक सुंदर अर्थ आहेत. राहा त्याच्या शुद्ध स्वरूपात म्हणजे दिव्य मार्ग. स्वाहिलीमध्ये याचा अर्थ आनंद. राहा हे संस्कृतमधील गोत्र आहे. बंगालीमध्ये नावाचा अर्थ आराम. अरबी भाषेत याचा अर्थ शांतता असा होतो.
या नावाचा अर्थ आनंद, स्वातंत्र्य असाही होतो, असे आलिया भट्टने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. आलियाच्या लेकीचे नाव तिच्या चाहत्यांना देखील प्रचंड आवडल्याचे दिसत आहे. अनेकांनी आलियाच्या या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.
आलियाने आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, धन्यवाद राहा, आमच्या कुटुंबाला जिंदादिल बनवल्याबद्दल, आमचे आयुष्य नुकतेच सुरू झाल्यासारखे वाटत आहे…आलियाच्या या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट करून अनेकजण शुभेच्छा देत आहेत.