मुंबई : आलिया भट्टचा (Alia Bhatt) ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) या चित्रपटाला चाहत्यांकडून उदंड प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या गंगूबाई या चित्रपटाने पहिल्याच दिवशी भरपूर कमाई केली आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श (Taran Adarsh) यांनीही सांगितले आहे की, आलियाचा हा चित्रपट कोरोना आणि लॉकडाऊनपासून सुरू आहे. सर्वाधिक कमाई करणारा हा तिसरा चित्रपट आहे. आलियाच्या गंगूबाईने ओपनिंग डेला 10.05 कोटी रुपये कमवले होते.
दुस-या दिवशी चित्रपटाचा 14 कोटींचा गल्ला
दुस-या दिवशी चित्रपटाने 14 कोटींचा गल्ला केला. त्यामुळे संजय लीला भन्साळी यांचा हा चित्रपट येत्या काही दिवसात नक्कीच धमाल करेल असा विश्वास आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांच्या ट्विटनुसार, आलिया भट्टचा चित्रपट पॅंडेमिक टाइममध्ये तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. पहिल्या क्रमांकावर, रोहित शेट्टीचा अक्षय कुमार स्टारर चित्रपट सूर्यवंशी याने 26,29 कोटींची कमाई करून पहिले स्थान मिळवले आहे. दुसरा क्रमांक रणवीर सिंहच्या 83 ने 12.64 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्याचवेळी गंगूबाई काठियावाडी आता 10.50 कोटी रुपयांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
इथे पाहा तरण आदर्श यांचे ट्विट
#OneWordReview…#GangubaiKathiawadi: BRILLIANT.
Rating: ⭐️⭐⭐⭐#SLB is a magician, gets it right yet again… Powerful story + terrific moments + bravura performances [#AliaBhatt is beyond fantastic, #AjayDevgn outstanding]… UNMISSABLE. #GangubaiKathiawadiReview pic.twitter.com/pIyaf1MWtv— taran adarsh (@taran_adarsh) February 25, 2022
गंगूबाई काठियावाडी चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद
आलिया भट्ट या चित्रपटात गंगा जगजीवनदास काठियावाड़ यांच्या भूमिकेत आहे. मुंबईला जाऊन हिरोईन बनण्याचे स्वप्न पाहणारी गंगा, पण हिरोईन बनण्याचे स्वप्न दाखवून गंगासोबत असे काही घडते ज्याचा तिने स्वप्नातही विचार केला नसेल. गंगाचा प्रियकर तिला फक्त काही पैशांसाठी विकतो. मग गंगा गंगूबाई बनून तिच्या आयुष्याला नव्याने सुरुवात करते. गंगूने आपले जीवन समाजसेवेसाठी समर्पित केले. हे सर्व या चित्रपटामध्ये दाखवण्यात आले आहे.
संबंधित बातम्या :
Gangubai Kathiawadi : ‘गंगुबाई’ सुपरहिट!, पहिल्याच दिवशी साडे दहा कोटींची कमाई