KBC मध्ये रजिस्ट्रेशनसाठी विचारला 10 वा प्रश्न, तुम्हाला माहित आहे उत्तर?

| Updated on: May 06, 2024 | 11:00 AM

Kaun Banega Crorepati | 'कोन बनेगा करोडपती' तुम्ही देखील खेळू शकता प्रश्न - उत्तरांचा खेळ... रजिस्ट्रेशनसाठी विचारण्यात आलेल्या 10 व्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती आहे? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त 'कोन बनेगा करोडपती' शोच्या आगामी भागाची चर्चा...

KBC मध्ये रजिस्ट्रेशनसाठी विचारला 10 वा प्रश्न, तुम्हाला माहित आहे उत्तर?
Follow us on

गेल्या अनेक वर्षांपासून ‘कोन बनेगा करोडपती’ शोला प्रेक्षकांकडून पसंती मिळत आहे. महानायक अमिताभ बच्चन होस्ट करत असलेल्या शोच्या आगामी भागाच्या प्रतीक्षेत देखील चाहते असतात. प्रश्न-उत्तरांच्या या खेळात बिग बी त्यांच्या अनोख्या अंदाजाने स्पर्धकांना प्रश्न विचारतात. विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरं देत स्पर्धक लाखो – कोट्यवधी रुपये जिंकतात. ‘कोन बनेगा करोडपती’ शोचा नवीन भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

जेव्हा नवीन भागाची चर्चा रंगत असते तेव्हा निर्माते प्रोमो व्हिडिओ जारी करतात आणि लोकांना प्रश्न विचारतात, ज्याची उत्तरे देऊन ते शोसाठी स्वतःचं रजिस्ट्रेशन करू शकतात. काही दिवसांपासून अमिताभ बच्चन समोर येऊन प्रश्न विचारत आहेत. 05 एप्रिल रोजी बिग बी यांनी शोसाठी 10 वा प्रश्न विचारला होता. ज्याला त्या प्रश्नाचे बरोबर उत्तर माहित आहे तो त्याचे उत्तर पाठवू शकतो.

काय होता प्रश्न?

प्रश्न | रुद्राक्ष पाटील, तिलोत्तमा सेन आणि अखिल शेओरान हे भारतीय खेळाडू 2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी कोणत्या खेळात पात्र ठरले आहेत? प्रश्न विचारल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी पर्याय देखील सांगितलं होते.

हे सुद्धा वाचा

A. निशानेबाजी

B. बॉक्सिंग

C. कुस्ती

D. धनुर्विद्या

प्रश्नाचं अचूक उत्तर निशानेबाजी असं होतं… सांगायचं झालं तर, गेल्या काही दिवसांपासून शोसाठी रजिस्ट्रेशन सुरु आहे. जो कोणी प्रश्नांची अचून उत्तर देईल, त्याला केबीसीपर्यंत पोहोचण्याची उत्तम संधी आहे. प्रश्नाचं उत्तर तुम्ही व्हाट्सएप किंवा मेसेज करुन देखील पाठवू शकता.

‘कोन बनेगा करोडपती’ शोमध्ये तुम्हाला देखील स्पर्धक म्हणून सहभारी व्हायचं असेल तर, ‘8591975331’ या क्रमांकावर अचूक उत्तर पाठवू शकता. मेसेजच्या माध्यमातून उत्तर द्यायचं असेल तर, KBC Answer (A/B/C/D) Age Gender (M/F/O) आणि उत्तर 5667711 वर देखील पाठवू शकता… शिवाय सोनी लिव्ह ऍपवर देखील तुम्ही उत्तर पाठवू शकता.

सांगायचं झालं तर, केबीसीचा हा 16वा सीझन आहे. हा शो कधी सुरू होईल याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार, ‘कोन बनेगा करोडपती’ जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात सुरू होऊ शकतो. ‘कोन बनेगा करोडपती’ शोच्या होस्टची जबाबदारी महानायक अमिताभ बच्चन यांच्या खांद्यावर असणार आहे.