महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा एखादा चित्रपट असेल आणि तो चर्चेत नसेल, असं कधी घडतच नाही. अमिताभ हल्ली अनेक नवीन विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. प्रत्येक चित्रपटाची कथा ही आधीच्या चित्रपटापेक्षा पूर्णपणे वेगळी असते आणि प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी पूर्ण जबाबदारी आत्तापर्यंत अमिताभ बच्चन यांनी घेतलेली आहे. काही दिवसांपूर्वीच “झुंड”(Jhund) हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट हल्ली सगळीकडे चर्चेचा विषय ठरलेला आहे. मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी हा चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कल्ला करत आहे आणि या चित्रपटाने सर्व स्तरातून कौतुक देखील मिळवलेले आहे. आधी ब्लॉकबस्टर मराठी चित्रपट सैराट नंतर आता थेट हिंदी सिनेमा (Hindi cinema) नागराज आपल्यासाठी घेऊन आलेले आहे. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांनी एका फुटबॉल कोच ची भूमिका साकारली आहे नुकतेच आमिर खान ने या चित्रपटाबद्दल वक्तव्य केले होते.
आमिर खान हा चित्रपट पाहायला आल्यानंतर आमिर खान खूपच भावूक (emotional) झाला होता. अमिताभ बच्चन यांनी साकारलेल्या भूमिकेबद्दल आमिर खान ने खूपच कौतुक केले होते. आणि आता अमिताभ बच्चन यांनी आमिर खान यांच्या भावनिक विधानावर प्रतिक्रिया देखील दिली आहे.
मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी पुन्हा एकदा आपल्या समृद्ध अभिनय शैलीने सर्वांना प्रभावित केले आहे.त्याचा “झुंड” हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी जोरदार पसंती देखील दिलेली आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या पूर्वी निर्मात्यांनी आमिर खान यांच्यासाठी एक स्पेशल स्क्रीनिंग होस्ट केली होती. चित्रपट पाहिल्यानंतर आमीर खान यांच्या डोळ्यातून अश्रू बाहेर आले. आमिर खूपच भावूक झाला होता. अमिताभ यांच्या अनेक महान चित्रपटातील एक चित्रपट असे वक्तव्य करून या चित्रपटाबद्दल कौतुक केले. हा चित्रपट पाहिल्यानंतर आमिर खान यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना म्हटले की, माझ्याकडे शब्दच नाही… या चित्रपटातून भारताच्या असंख्य लोकांच्या भावना तुम्ही लोकांसमोर मांडल्या आहेत आणि या भावना अविश्वसनीय आहेत.
आता बॉलीवुड हंगामाला दिलेल्या इंटरव्यू मध्ये बिग बी यांनी आमिर यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. अमिताभ यांनी आमिर चे आभार मानले आणि आमिर च्या ‘ओवर-एक्साइटमेंट’ वर ते थोडेसे हसले. अमिताभ यांनी म्हंटले की, आमिरला ओवर एक्साइटेड होण्याची सवय आहे. या महान अभिनेत्याने असे देखील सांगितले की, आमिर हमेशा पासून चित्रपटाचे चांगले जज राहिले आहेत. त्यांनी पुढे सांगितले की ,मी अमीर यांचे खूपच आभार मानतो की अमीर यांनी या चित्रपटाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आणि त्यासाठी त्यांच्याकडे काही शब्द आहेत!
आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की , “झुंड” चित्रपट नागराज पोपटराव मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेला आहे. या चित्रपटांमध्ये बिग बी फुटबॉल कोच विजय परसे यांची भूमिका साकारत आहेत. या चित्रपटामध्ये झोपडपट्टीतील मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहित केले गेले आहे. या चित्रपटामध्ये आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु यांची देखील प्रमुख भूमिका आहे.अमिताभ यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास यांच्याकडे आगामी चित्रपटांची एक तगडी लाईन आहे. प्रोजेक्ट के’, ‘ब्रह्मास्त्र’, ‘द इंटर्न’, ‘रनवे 34’ और ‘गुडबाय’ या चित्रपटात अमिताभ दिसून येतील.