मुंबई : नॅशनल क्रश अर्थात रश्मिका मंदानाने बॉलिवूडमध्ये (Bollywood) जोरदार पदार्पण केलंय. नुकताच रश्मिकाचा ‘गुडबाय’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. विशेष म्हणजे या चित्रपटात रश्मिकाला थेट अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची सुवर्णसंधी मिळाली. रश्मिका आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा हा चित्रपट 7 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात (Movie) प्रदर्शित झालाय. या चित्रपटाला प्रेक्षकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळालाय. मात्र, आता हळूहळू बाॅक्स आॅफिस कलेक्शन कमी होण्यास सुरूवात झालीये.
गुडबाय चित्रपटात अमिताभ बच्चन, रश्मिका मंदाना आणि नीना गुप्ता हे मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट मुलगी आणि वडिलांच्या सुंदर नात्यावर आधारित होता. या चित्रपटात रश्मिका मुलीच्या भूमिकेत तर अमिताभ बच्चन हे वडिलांच्या भूमिकेत आहेत. चित्रपटात मनोरंजनाचा पूर्ण डोस दिलाय. शिवाय हा चित्रपट आपण आपल्या फॅमिलीसोबत पाहू शकतो. सुरूवातीपासूनच या चित्रपटाची प्रचंड चर्चा देखील होती.
अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदानाचा गुडबाय हा चित्रपट जे कोणी चित्रपटगृहात जाऊन पाहू शकले नाहीयेत. अशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी असून हा चित्रपट आता आपण घरी बसून पाहू शकणार आहोत. नेटफ्लिक्सने गुडबायचे ओटीटी हक्क विकत घेतले आहेत. म्हणजेच काय तर आता हा खास चित्रपट आपण नेटफ्लिक्सवर पाहू शकणार आहोत. साधारण रिलीजच्या 6 आठवड्यांनंतर चित्रपट आपण नेटफ्लिक्सवर पाहू शकणार असल्याचे कळते आहे.