Uunchai Box Office | 500 स्क्रीन्सवर रिलीज होणार ‘ऊंचाई’, बाॅक्स ऑफिसवर तोडणार सर्व रेकाॅर्ड?

| Updated on: Nov 11, 2022 | 7:30 AM

काही दिवसांपूर्वी रश्मिका मंदाना आणि अमिताभ बच्चन यांचा गूड बाय हा चित्रपट रिलीज झाला होता.

Uunchai Box Office | 500 स्क्रीन्सवर रिलीज होणार ऊंचाई, बाॅक्स ऑफिसवर तोडणार सर्व रेकाॅर्ड?
Follow us on

मुंबई : अमिताभ बच्चन यांचा ऊंचाई हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात होते. काही दिवसांपूर्वी रश्मिका मंदाना आणि अमिताभ बच्चन यांचा गूड बाय हा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, म्हणावा तसा प्रतिसाद या चित्रपटाला मिळाला नाही. आता अमिताभ बच्चन यांचा ऊंचाई हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर काय धमाका करतो, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. या चित्रपटात चार मित्रांची सुंदर अशी मैत्री दाखवण्यात आलीये.

ऊंचाई चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबतच अनुपम खेर, बोमन इराणी, परिणीती चोप्रा, नीना गुप्ता आणि डॅनी डेन्झोंगपा हे प्रमुख भूमिकेत आहेत. कोरोनाच्या काळानंतर बाॅक्स ऑफिसवर बाॅलिवूडचे चित्रपट काही खास धमाका करू शकत नसतानाच आता अमिताभ बच्चन यांचा चित्रपट ऊंचाई काय कमाल करतो, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. पहिल्या दिवशी चित्रपट बाॅक्स ऑफिसवर तब्बल 5-7 कोटी कलेक्शन करेल असा अंदाजा लावला जातोय.

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाले होते. विशेष म्हणजे प्रेक्षकांना चित्रपटाचे ट्रेलर प्रचंड आवडले आहे. अमिताभ बच्चन, बोमन इराणी आणि अनुपम खेर हे या टप्प्यामध्ये माउंट एव्हरेस्ट चढण्याचे स्वप्न पाहतात आणि बेस कॅम्पला रवाना होतात, असे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले होते. नुकताच मुंबईत या चित्रपटाचा भव्य प्रीमियरही पार पडला. हा चित्रपट 500 स्क्रीन्सवर रिलीज होणार आहे.