मुंबई : सतीश कौशिक यांच्या निधनाची बातमी ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला. सतीश कौशिक, अनुपम खेर आणि अनिल कपूर (Anil Kapoor) हे खूप चांगले मित्र होते. सतीश कौशिक यांच्या निधनाची बातमी सर्वात अगोदर अनुपम खेर यांनी दिली. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर अनुपम खेर (Anupam Kher) यांनी एक व्हिडीओ शेअर केला आणि त्या व्हिडीओमध्ये सतीश कौशिक (Satish Kaushik) यांच्या आठवणीमध्ये ढसाढसा रडताना अनुपम खेर दिसले. आमच्या 45 वर्षाच्या मैत्रीला अचानक असा पूर्णविराम लागला आहे. हरी ओम शांती….अशी पोस्ट अनुपम खेर यांनी शेअर केली होती.
सलमान खान हा सतीश कौशिक यांना शेवटचा निरोप देण्यासाठी पोहचला होता. यावेळी सलमान खान यालाही आपले अश्रू रोखणे अवघड झाले. आकाशाकडे बघून रडताना सलमान खान हा दिसला होता. बाॅलिवूडच्या अनेक कलाकारांनी सतीश कौशिक यांच्या निधनानंतर पोस्ट शेअर करत दु: ख व्यक्त केले होते.
सतीश कौशिक यांच्या निधनानंतर 13 एप्रिल रोजी त्यांची पहिली बर्थ अनिवर्सरी म्हणजेच जयंती पार पडली. मुंबईतील जुहू परिसरातील इस्काॅनमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला बाॅलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली. आता या कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
एका व्हिडीओमध्ये अनिल कपूर हे दिसत आहेत. यावेळी अनिल कपूरला अनुपम खेर हे बोलवतात. अनुपम खेर म्हणतात की, अनिल तू इकडे ये…अनिल कपूर देखील अनुपम खेर यांचे बोलणे ऐकून निघतात. मात्र, मध्येच थांबतात आणि ढसाढसा रडायला लागतात आणि मला हे नाही जमणार म्हणून वापस जागेवर जातात.
अनिल कपूर याला ढसाढसा रडताना पाहून अनुपम खेर हे देखील रडताना दिसले. अनुपम खेर म्हणाले की, यार अनिल तू पागल आहेस का? सर्व ठिक आहे. मी माझे चांगले जात होतो. या व्हिडीओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की, एक मित्र गेल्यानंतर काय दु:ख होते. अनिल कपूर आणि अनुपम खेर हे सतीश कौशिक यांच्या आठवणीमध्ये रडताना दिसत आहेत.
आता सोशल मीडियावर अनिल कपूर यांचा रडतानाचा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत असून अनेकांनी थेट म्हटले की, मैत्री असावी तर यांच्यासारखी. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवरून हे स्पष्ट होत आहे की, अनिल कपूर, सतीश कौशिक आणि अनुपम खेर हे किती जास्त मित्र होते.