डेंजरच… मायनस 110 डिग्री सेल्सिअस तापमानात अनिल कपूर यांचं कपड्यांशिवाय वर्कआऊट; व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Apr 11, 2023 | 10:01 AM

अभिनेता अनिल कपूर पुन्हा एकदा त्यांच्या वर्कआऊटमुळे चर्चेत आहेत. सध्या त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात ते मायनस 110 डिग्री सेल्सिअस तापमानात वर्कआऊट करताना दिसत आहेत.

डेंजरच... मायनस 110 डिग्री सेल्सिअस तापमानात अनिल कपूर यांचं कपड्यांशिवाय वर्कआऊट; व्हिडीओ व्हायरल
Anil Kapoor
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर इंडिया अभिनेता अनिल कपूर आणि त्यांचं वर्क आऊटचं वेड सर्वांना परिचित आहे. दिवसभर शुटिंग केलेलं असू देत की रात्री उशिरापर्यंत शुटिंग झालेलं असू देत. अनिल कपूर पहाटे 4 वाजता उठून वर्क आऊट करतात म्हणजे करतातच. त्यामुळेच वयाच्या 66 व्या वर्षीही अनिल कपूर फिट आणि फाईन आहेत. एखाद्या तरुणालाही लाजवेल अशी पर्सनॅलिटी आणि बॉडी त्यांनी कमावली आहे. त्यामुळे त्यांच्या फिटनेसची नेहमीच चर्चा होत असते. आता अनिल कपूर यांचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे. त्यात ते मायनस 110 डिग्री सेल्सिअस तापमान म्हणजे दात कडाकडा वाजतील इतक्या भयंकर थंडीत वर्क आऊट करताना दिसत आहेत. त्यामुळे सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं आहे. त्यांचे फॅन तर व्हिडीओ पाहून अचंबित झाले आहेत.

 

हे सुद्धा वाचा

अनिल कपूर हे फिटनेसच्या बाबतीत आजच्या जनरेशनला तोडीस तोड देतात. त्यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ते कडाक्याच्या थंडीत व्यायाम करताना दिसत आहेत. वर्क आऊट करताना अनिल कपूर हाफ पँटमध्ये आहेत. त्यांनी शर्ट सुद्धा घातलेलं नाही. मात्र, त्यांनी डोक्यावर टोपी घातल्याचं या व्हिडीओतून स्पष्टपणे दिसून येत आहे.

रोज वर्कआऊट

अनिल कपूर हे फिटनेसची प्रचंड काळजी घेतात. बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेते फिटनेसची काळजी घेतात. त्यापैकी अनिल कपूर एक आहेत. अनिल कपूर रोज पहाटे चार वाजता एक तास वर्कआऊट करतात. एक सेशनही मिस करत नाहीत. त्यामुळे त्यांची प्रकृती उत्तम आणि ठणठणीत असते. त्यांच्या चेहऱ्यावर कायम प्रसन्नता असते.

व्हिडीओ पाहून सर्वच हैराण

अनिल कपूर यांचा एवढ्या कडाक्याच्या थंडीत वर्क आऊट करतानाचा व्हिडीओ पाहून सर्वच हैराण झाले आहेत. एवढेच नव्हे तर हे कसे शक्य आहे? असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. अनिल कपूर सध्या कायरोथेरेपी म्हणजे कोल्ड थेरेपी द्वारे फॅट लूज करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा एक्सरसाईज प्रोफेशनल्सच्या देखरेखीखाली होतात.

मायनस 110 डिग्री सेल्सियसमध्ये कार्डियो

अनिल कपूर हे मायनस 110 डिग्री सेल्सिअसमध्ये कार्डिओ करत असल्याचं या व्हायरल व्हिडीओत दिसत आहे. अनिल कपूर जेव्हा बाहेर पडतात तेव्हा त्यांची थंडीगार स्टीमही बाहेर पडताना दिसत आहे.

आवरा यांना

हा व्हिडीओ शेअर करताना अनिल कपूर यांनी पोस्ट लिहिली आहे. चाळीशीत नॉटी होण्याचा टाइम गेला. आता साठीत सेक्सी होण्याची वेळ आहे. फायटर मोड ऑन आहे, असं अनिल कपूर यांनी म्हटलं आहे. त्यावर एका यूजर्सने तिरकस कमेंट केली आहे. कुणी तरी आवरा यांना, असं या यूजर्सने म्हटलं आहे.