अर्जुन कपूर याची बहीण या आजाराने ग्रस्त, संपूर्ण शरीरावर स्ट्रेच मार्क्स, अंशुला हिने केला मोठा खुलासा

| Updated on: May 07, 2023 | 6:04 PM

अर्जुन कपूर याची याची बहीण आणि बोनी कपूर यांची लेक अंशुला कपूर ही बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे. मात्र, अंशुला कपूर ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. काही दिवसांपूर्वीच अंशुला कपूर हिने बिकिनीमधील एक फोटो शेअर करत आपण किती वजन कमी केले हे चाहत्यांना सांगताना दिसली.

अर्जुन कपूर याची बहीण या आजाराने ग्रस्त, संपूर्ण शरीरावर स्ट्रेच मार्क्स, अंशुला हिने केला मोठा खुलासा
Follow us on

मुंबई : बोनी कपूर यांची लेक आणि अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) याची बहीण अंशुला कपूर ही कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी अंशुला कपूर हिने तिचे काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंमध्ये अंशुला कपूर हिने बरेच वजन कमी केल्याचे दिसत होते. गेल्या काही दिवसांपासून अंशुला कपूर (Anshula Kapoor) हिचे नाव सतत रोहन ठक्कर याच्यासोबत जोडले जात आहे. अनेकदा अंशुला ही सोशल मीडियावर रोहन ठक्कर याच्यासोबत फोटोही (Photo) शेअर करताना दिसते. रोहन ठक्कर आणि अंशुला कपूर हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सतत रंगताना दिसत आहेत.

नुकताच अंशुला कपूर हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अत्यंत मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे. अंशुला कपूर हिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. अंशुला कपूर हिने खुलासा करत सांगितले की, ती वयाच्या 14 व्या वर्षापासून पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम या आजाराने ग्रस्त आहे.

इतकेच नाही तर या आजारामुळे तिचे वजन सतत वाढत होते आणि तिला आपल्या वाढलेल्या वजनावर नियंत्रण मिळवणे देखील शक्य होत नव्हते. या आजारामुळे तिच्या संपूर्ण शरीरावर स्ट्रेच मार्क्स पडले. यामुळे तिला कायमच लोकांसमोर जाण्यास संकोच वाट असे. इंस्टाग्रामवर अंशुला हिने ही पोस्ट शेअर केलीये.

पोस्ट शेअर करत अंशुला कपूर हिने लिहिले की, हा फोटो आठवडाभर ड्राफ्ट करून ठेवला होता. मुळात म्हणजे मला नाही माहिती की, हा फोटो डिलीट करायचा असताना मी रात्री अचानक कसा पोस्ट केला, इतकी हिंमत माझ्यात कुठून आली. मी माझ्या अर्ध्याहून अधिक आयुष्यात माझ्यामध्ये कधीच सौंदर्य बघितले नाही.

मुळात म्हणजे आपण कधीच पुस्तकाचे कवर पाहून आतमध्ये काय आहे याचा अंदाजा लावू शकत नाहीत. आपण बाहेरून बघून एखादी गोष्ट ठरवतो. मात्र, आपण हे कधीच नाही पाहत की, मध्ये किती जास्त सुंदर आहे. मला माहित नव्हते की मी स्वतःमध्ये ती प्रतिभा कधी बघेल आणि इतरांना देखील दाखवेल.

इतकेच नाही तर मी कधीच विचार केला नव्हता की, मी आरश्यामध्ये कशी दिसेल. याचा विचार न करताच मी स्वत: च्या प्रेमात पडले. अंशुला म्हणते की, सकारात्मक गोष्टींपेक्षा काहीतरी नकारात्मक पाहणे सोपे का आहे? हा विचार आपण आजपासूनच बदलू शकत नाही का?…आता अंशुला कपूर हिची ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.