अनुपम खेर यांनी थेट दिला होता महेश भट्टला हा श्राप, संतापून थेट मुंबई सोडण्याचाही निर्णय

| Updated on: May 02, 2023 | 9:17 PM

बाॅलिवूड अभिनेते अनुपम खेर हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. अनुपम खेर यांनी द कश्मीर फाईल्स चित्रपटाला एकही फिल्मफेअर अवॉर्ड्स मिळाला नसल्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मोठे भाष्य केले होते. सतत गेल्या काही दिवसांपासून अनुपम खेर हे चर्चेत आहेत.

अनुपम खेर यांनी थेट दिला होता महेश भट्टला हा श्राप, संतापून थेट मुंबई सोडण्याचाही निर्णय
Follow us on

मुंबई : बाॅलिवूड अभिनेते अनुपम खेर हे कायमच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी अनुपम खेर (Anupam Kher यांचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी आपल्या बाॅडीवर खूप जास्त मेहनत ही अनुपम खेर यांनी घेतली होती. अनुपम खेर यांनी काही दिवसांपूर्वी सतीश काैशिक (Satish Kaushik) यांच्या मुलीसोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओमध्ये अनुपम खेर हे सतीश काैशिक यांच्या मुलीसोबत रिल्स तयार करताना दिसले. सतिश काैशिक यांच्या अशाप्रकारे जाण्याने अनुपम खेर यांना मोठा धक्का बसलाय. एका व्हिडीओमध्ये (Video) सतिश काैशिक यांच्या आठवणीमध्ये अनुपम खेर हे ढसाढसा रडताना देखील दिसले आहेत.

जेंव्हा बाॅलिवूडमध्ये काम करण्यासाठी अनुपम खेर ही सतत मेहनत करत होते आणि असे काही घडले की, त्यांना चक्क अचानक मुंबई सोडून जाण्याची वेळ आली होती. हा किस्सा काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अनुपम खेर यांनी सांगितला आहे. इतकेच नाही तर अनुपम खेर हे इतके जास्त चिडले होते की, ते थेट महेश भट्ट यांना भांडण्यासाठी गेले होते.

अनुपम खेर यांनी भांडणामध्ये चक्क महेश भट्ट यांना श्राप देखील देऊन टाकला होता. घडले असे होते की, अनुपम खेर यांना सारांश चित्रपटासाठी कास्ट केले गेले होते. मात्र, अचानक त्यांना चित्रपटातून काढून टाकल्याचे सांगितले गेले. सारांश चित्रपटासाठी अनुपम खेर यांनी खूप जास्त मेहतन घेतली होती. या चित्रपटात ते एका 60 वर्षांच्या व्यक्तीच्या भूमिकेत होते.

यासाठी अनुपम खेर हे घरातून धोती घालून निघायचे…या रोलसाठी त्यांनी खूप जास्त मेहनत घेतली होती. मात्र, अचानकच आपल्याला चित्रपटातून काढून टाकल्याचे समजताच त्यांनी थेट मुंबई सोडून जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, जाण्याच्या अगोदर एक वेळ फक्त त्यांना महेश भट्ट यांना भेटायचे होते. शेवटची भेट घेऊन मुंबई सोडायची होती.

अनुपम खेर थेट महेश भट्ट यांना भेटण्यासाठी गेले आणि त्यांना खिडकीमधून बाहेर दाखवत म्हणाले की, बाहेर जी रस्त्यावर गाडी उभी दिसत आहे, त्यामध्ये माझे साहित्य आहे आणि मला तुम्हाला जाण्यापूर्वी भेटून हे सांगायचे आहे की तुम्ही फसवे आहेत. मी शेवटच्या वेळी बोलायला आलो आणि मी एक ब्राह्मण व्यक्ती म्हणून तुम्हाला श्राप देखील देणार आहे. त्यानंतर लगेचच महेश भट्ट यांनी राजश्रीला फोन केला आणि सांगितले की फक्त अनुपम हाच सारांश चित्रपट करेल.