मुंबई : सतीश कौशिक यांच्या निधनाची बातमी ऐकल्यावर सर्वांनाच मोठा धक्का बसला. वयाच्या 66 व्या वर्षी सतीश कौशिक (Satish Kaushik) यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने सतीश कौशिक यांचे निधन झाले. सलमान खान याच्यापासून रणबीर कपूर याच्यापर्यंत जवळपास सर्वच बाॅलिवूड स्टार हे सतीश कौशिक यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी पोहचले होते. इतकेच नाहीतर बाॅलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खान हा देखील रडताना दिसला. अनुपम खेर आणि सतीश कौशिक यांच्यामध्ये अत्यंत खास मैत्री होती. अनुपम खेर (Anupam Kher) आणि सतीश कौशिक यांनी त्यांच्या करिअरची सुरूवात देखील सोबत केली.
सतीश कौशिक यांच्या निधनाची बातमी अनुपम खेर यांनीच शेअर केली. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सतीश कौशिक हे आपल्यामध्ये राहिले नसल्याचे अनुपम खेर यांनी सांगितले. त्यानंतर बाॅलिवूडच्या अनेक कलाकारांनी सतीश कौशिक यांच्या आठवणीमध्ये सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या.
सतीश कौशिक आणि अनुपम खेर यांची मैत्री ही तब्बल 45 वर्षांची होती. सतीश कौशिक यांच्या निधनाने अनुपम खेर यांना मोठा धक्का बसलाय. सतीश कौशिक यांच्या अत्यसंस्कारच्या वेळी अनुपम खेर हे ढसाढसा रडताना देखील दिसले होते. यावरूनच कळते की, सतीश कौशिक आणि अनुपम खेर यांची मैत्री किती जास्त खास होती.
नुकताच अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये अनुपम खेर यांना त्यांचे अश्रू रोखणे अवघड झाल्याचे दिसत आहे. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर अनुपम खेर किती जास्त तुटले आहेत, हे या व्हिडीओमधून स्पष्ट दिसत आहे. अनुपम खेर आणि सतीश कौशिक यांच्यामध्ये दररोज सकाळी एक काॅल होत असत हे सांगताना अनुपम खेर दिसले.
सतीश कौशिक यांची आठवण येत असल्याचे सांगत अनुपम खेर हे इमोशनल झाल्याचे बघायला मिळाले. व्हिडीओमध्ये अनुपम खेर म्हणाले की, मी आज विचार करत होते की, जेवणामध्ये काय खावे? मला आठवले की, चला आता सतिशला काॅल करूयात…मी हातामध्ये फोनही घेतला….मात्र, परत प्रश्न पडला की, आता फोन कसा करायचा?
खरोखरच हे सर्वकाही माझ्यासाठी खूप जास्त कठीण आहे. आम्ही दोघांनी 45 वर्ष एकमेकांसोबत घालवली. आम्ही दोघांनी स्वप्नेही एकत्र बघितले…एका नव्या प्रवासाला आम्ही सोबतच सुरूवात केली…आम्ही खूप कष्ट केले… अनेक वेळा आम्हाला एकमेकांचा हेवा वाटला आणि मग इथपर्यंत पोहोचलो. पण आम्ही कधीच एकमेकांपासून वेगळे झालो नाहीत…मला प्रत्येक क्षणाला आज सतीश कौशिक याची आठवण येत आहे. अनुपम खेर यांनी हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केलाय.