मुंबई : अनुपम खेर हे त्यांच्या जबरदस्त अभिनयासाठी ओळखले जातात. ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटामध्ये तर अनुपम खेर यांनी भूमिका करून एक वेगळीच छाप सोडलीये. द काश्मीर फाइल्स या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर धमाल केली. या चित्रपटानंतर अनुपम खेर यांचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नुकताच अनुपम खेर यांचा अभिताभ बच्चन यांच्यासोबतचा ऊंचाई हा चित्रपट रिलीज झालाय. बाॅक्स आॅफिसवर बाॅलिवूडचे चित्रपट फ्लाॅप जात असतानाच अनुपम खेर आणि अमिताभ बच्चन यांचा ऊंचाई हा चित्रपट चांगली कमाई करतोय.
ऊंचाई या चित्रपटात मित्रांची सुंदर अशी मैत्री दाखवण्यात आलीये. विशेष म्हणजे जर मानसाने काही गोष्टी करायच्या ठरवल्या तर त्याला त्याचे वयही रोखू शकत नाही, असे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. मात्र, अनुपम खेर यांनी त्यांच्या बाॅलिवूड करिअरमध्ये अनेकदा चांगले वाईट दिवस बघितले आहेत.
अनुपम खेर यांच्या आयुष्यामध्ये एक वेळ अशी आली होती की, त्यांचे बॅंक खाते पूर्णपणे रिकामे झाले होते. त्यांना हे सर्व परत एकदा नव्याने सुरू करायचे होते. यादरम्यानच्या काळात काही लोकांनी त्यांच्यावर टीका करण्यासही सुरूवात केली होती.
अनुपम खेर म्हणाले की, काही काळानंतर मी अमेरिकेत गेलो आणि तेथील वेब सीरिजमध्ये काम करण्यास सुरूवात केली. इतकेच नाही तर लोक 60 व्या वर्षी रिटायरमेंट घेतात. मात्र, मी या वयामध्ये बॉडी बनवण्यास सुरूवात केलीये. मी आयुष्यात बऱ्याच गोष्टी बघितल्या आहेत.
अनुपम खेर पुढे म्हणाले की, एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान मला फेशियल पैरालिसिस झाला होता. यानंतर डाॅक्टरांनी मला कमीत कमी काम करण्याचा आणि दोन महिने घरी राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र, मी आजही काम करतोय.
कोरोनानंतर बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर काही खास कमाल करून शकत नसताना बिग बी आणि अनुपम खेर यांचा चित्रपट हीट ठरला. हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडतोय. पुढील काही दिवस चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करेल, असे सांगितले जात आहे.