मुंबई : अनुराग कश्यप (Anurag Kashyap) त्याच्या आगामी ‘दोबारा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अनुराग कश्यपच्या या चित्रपटात तापसी पन्नू मुख्य भूमिकेत आहेत. दोबारा चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी (Trailer launch) अनुराग कश्यपने हिंदी चित्रपट बॉक्स ऑफिसवर का सातत्याने फ्लॉप होत आहेत, याचे मुख्य कारण सांगितले आहे. हिंदी चित्रपट फ्लॉप होण्याचे कारण देताना अनुराग कश्यप म्हणाले की, आजकाल हिंदी चित्रपटांना (Hindi movies) मूळच राहिले नाही, कारण चित्रपट निर्माते प्रेक्षकांना प्रभावित करण्यासाठी त्यांच्या शैलीच्या बाहेर जात आहेत.
अनुराग पुढे म्हणाले की, तमिळ, तेलुगू, मल्याळम चित्रपट त्यांच्या संस्कृतीशी जोडलेले आहेत. पण हिंदी चित्रपटांबाबत तसे नाही. आता हिंदी चित्रपटसृष्टीत असे चित्रपट निर्माते आहेत ज्यांना हिंदीही बोलता येत नाही आणि ही गोष्ट त्यांच्या चित्रपटांमध्येही दिसून येते. जे इंग्रजी बोलतात आणि त्यांना हिंदी देखील येत नाही ते हिंदी चित्रपट बनवत आहेत. मुख्य प्रवाहातील चित्रपट निर्माते जेव्हा त्यांच्या शैलीतील चित्रपट बनवतील तेंव्हाच ते चित्रपट हिट ठरतील.
संजय लीला भन्साळीच्या गंगूबाई काठियावाडी आणि भूल भुलैया 2 याचीच उत्तर उदाहरणे आहेत, असेही अनुराग म्हणाले आहेत. हे दोन्ही हिंदी चित्रपट आहेत कोरोनानंतरच रिलीज झाले आहेत. ज्यांनी बॉक्स ऑफिसवर धमाल केलीयं. दोबारा चित्रपटातून अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू ही दमदार जोडी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. दोबारा हा 2018 सालच्या स्पॅनिश चित्रपट मिराजचा रिमेक आहे. हा चित्रपट 19 ऑगस्टला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.