मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) सध्या यूकेमध्ये पती विराट कोहली आणि मुलगी वामिकासमवेत मोकळा वेळ घालवत आहे. विराट कोहली त्याच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडला गेला आहे, तेथे अनुष्का आणि त्यांची मुलगीही त्यांच्यासोबत गेली आहे. कोहली कुटुंब इंग्लंडमध्ये हवामानाचा आणि कधीकधी चविष्ट अन्नाचा आनंद घेत असतानाचे व्हिडीओ आणि फोटो अनुष्का शेअर करत राहते. आता अनुष्का मुलगी वामिकासोबत बाहेर फिरायला गेली होती. तिचे फोटो सोशल मीडियावर खूप चर्चेत आले आहेत (Anushka Sharma and baby Vamika spotted on London street).
अनुष्काचे फोटो सोशल मीडियावर खूपच चर्चेत आले आहेत. एका फॅन क्लबने अभिनेत्रीचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये अनुष्काने लाँग तपकिरी रंगाचा कोट परिधान केला होता. मात्र, या फोटोंमध्येही वामिकाचा चेहरा स्पष्ट दिसत नाहीय.
सोमवारी अनुष्का शर्माने विराट कोहलीसोबत नाश्ता करतानाचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. फोटोमध्ये अनुष्का काहीतरी खाताना दिसली होती, तर विराट हातात एक कप धरून बसलेला आहे आणि कॅमेराकडे पोज देत आहे.
अनुष्काने एक नवीन उपक्रम सुरू केला आहे, ज्यामध्ये ती आपले मॅटरनिटी कपडे विकत आहे. या विक्रीमधून जमा झालेल्या पैशातून अनुष्काने स्नेहा नावाच्या फाउंडेशनच्या गर्भवती महिलांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय ती अडीच लाख लिटर पाणी वाचवण्यात हातभार लावणार आहे.
अनुष्का सध्या आपल्या मुलीच्या संगोपनावर लक्ष केंद्रित करत आहे. यावेळी घराबाहेर जाऊन शूटिंग करून तिला कोणताही धोका पत्करायचा नाही. वृत्तानुसार, ऑक्टोबरमध्ये कोरोना विषाणूची तिसरी लाट येणार आहे, ज्याचा अधिक परिणाम लहान मुलांवर होताना दिसत आहे. अनुष्का यावेळी सर्व सेफ्टी प्रोटोकॉलची काळजी घेत आहे आणि घराबाहेर देखील जात नाही. यावर्षी कुठल्याही शूटची योजना आखू नका, असंही तिने आपल्या टीमला सांगितलं आहे.
यावेळी पूर्ण करण्यासाठी अनुष्काकडे कोणतेही अभिनय असाइनमेंट नाहीत. अनुष्का शर्मा निर्माता बनली आहे आणि त्यावर लक्ष केंद्रित करत आहे. अनुष्काचे प्रॉडक्शन हाऊस सतत उत्तम कंटेंट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लवकरच, तिचे नेटफ्लिक्सवर दोन प्रोजेक्ट प्रदर्शित होणार आहेत. यात साक्षी तंवरची ‘माई’ आणि अनविता दत्ताच्या ‘काला’चा समवेश आहे. याद्वारे दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबील खान अभिनयाच्या दुनियेत पाऊल टाकणार आहे. याशिवाय अनुष्काचे प्रॉडक्शन हाऊस ‘पाताल लोक 2’ वरही काम करत आहे.
(Anushka Sharma and baby Vamika spotted on London street)
Devmanus | देवीसिंगचा जुळा भाऊ डॉ. अजित कुमार देव? ‘देवमाणूस’ मालिकेत येणार मोठा ट्वीस्ट!