मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. ती रोज तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. लेक वामिकाच्या जन्मापासूनच अनुष्का तिची खूप काळजी घेत आहे. आजकाल अनुष्का पती विराट (Virat kohli) आणि मुलगी वामिकासमवेत इंग्लंडमध्ये आहे. विराट कसोटी मालिकेसाठी इंग्लंडला गेला आहे. तिथल्या हवामानाचा आनंद लुटत असताना अनुष्का काही फोटो देखील शेअर केले होते. आता अनुष्काने एक नवा हेअरकट केला आहे, ज्याचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे (Anushka Sharma got new hair cut after baby vamika birth).
अनुष्काने तिचे केस कापून लहान केले आहेत. फोटोमध्ये अनुष्काने पांढऱ्या रंगाचे टॉप आणि मस्टर्ड रंगाचे लहान जॅकेट परिधान केले आहे. तिचा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. फोटो शेअर करताना अनुष्काने लिहिले की, जेव्हा बाळाच्या जन्मानंतर गळणारे केस तुम्हाला एक चांगला हेअर कट करण्यास प्रोत्साहित करतात.’ याच बरोबर सोनम कपूरने तिचा हेअरस्टायलिस्ट सुचवून अनुष्काचे काम सोपे केल्याने, अनुष्काने सोनमचे आभार मानले आहेत.
अनुष्काच्या फोटोंवर कमेंट करताना तिचे चाहते तिच्या नवीन स्टाईलचे कौतुक करत आहेत. एका चाहत्याने लिहिले, ‘तुम्ही खूप चमकत आहात.’ दुसरीकडे, आणखी एका चाहत्याने लिहिले, ‘फॅन्टेस्टिक.’ अनुष्काचा हा फोटो 10 लाखाहून अधिक लोकांनी पसंत केला आहे.
या वर्षाच्या सुरुवातीस अनुष्का शर्मा आणि विराट कोहली मुलीचे पालक बनले आहेत. फेब्रुवारीमध्ये त्यांनी आपल्या मुलीचे फोटो शेअर केले आणि सर्वांना तिचे नाव सांगितले होते. विराट आणि अनुष्काने मुलगी वामिकाला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी म्हटले की, ते सोशल मीडियावर वामिकाची छायाचित्रे शेअर करणार नाहीत. तसेच, फोटोग्राफर्सना देखील वामिकाची छायाचित्रे पोस्ट करण्यास मज्जाव केला होता.
अनुष्का शर्मा अखेर शाहरूख खान आणि कतरिना कैफसोबत ‘झिरो’ चित्रपटात दिसली होती. त्यानंतर त्याने मोठ्या पडद्यावरून ब्रेक घेतला होता. जर, अहवालांवर विश्वास ठेवला गेला तर अनुष्काने आता 2022पर्यंत हा ब्रेक वाढवला आहे. अनुष्काला यावेळी मुलगी वामिकावर लक्ष केंद्रित करायचं आहे, त्यामुळे ती आता इतक्यात मोठ्या पडद्यावर परतणार नाही आणि अभिनयाऐवजी प्रॉडक्शन हाऊसवर लक्ष केंद्रित करणार आहे.
(Anushka Sharma got new hair cut after baby vamika birth)
Karan Mehra | अभिनेता करण मेहराच्या अडचणी वाढल्या, पत्नी निशाने दाखल केला दुसरा गुन्हा