A. R. Ameen | ए.आर. रहमान याचा मुलगा अमीन गाणे म्हणत असताना घडली मोठी दुर्घटना, थेट

| Updated on: Mar 05, 2023 | 6:09 PM

ए.आर. रहमान याचा मुलगा अमीन हा मोठया अपघातातून नुकताच बचावला आहे. हा अपघात इतका जास्त मोठा होता की, एक सेकंद जरी मागे पुढे झाले असते तरीही होत्याचे नव्हते झाले असते. याची माहिती अमीन याने दिलीये.

A. R. Ameen | ए.आर. रहमान याचा मुलगा अमीन गाणे म्हणत असताना घडली मोठी दुर्घटना, थेट
Follow us on

मुंबई : ए.आर.रहमान याचा मुलगा ए.आर. अमीन (A. R. Ameen) याच्याबद्दल एक धक्कादायक बातमी पुढे येतंय. विशेष म्हणजे ए.आर. अमीन यानेच एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना याबद्दल माहिती दिलीये. ए.आर. अमीन याने केलेल्या पोस्टनंतर त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळत आहे. सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. ए.आर. अमीन हा थोड्यात वाचला आहे. आपण मृत्यूच्या दाढेतून कसे वाचलो हे ए.आर. अमीन याने सांगितले आहे. ए.आर.रहमान (A. R. Rahman) याच्यासोबतच ए.आर. अमीन याचीही मोठी फॅन फाॅलोइंग सोशल मीडियावर (Fan following) बघायला मिळते. एका प्रोजेक्टच्या शूटिंग सेटवर काय घडले याची माहिती ए.आर. अमीन याने चाहत्यांसोबत शेअर केलीये.

ए.आर. अमीन हा एका प्रोजेक्टच्या शूटिंग सेटवर झालेल्या अपघातात थोडक्यात बचावला आहे. ए.आर. अमीन याने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत याच्याबद्दलची माहिती आणि काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून चाहत्यांना देखील मोठा धक्का बसलाय. अनेकांनी यावर चिंता देखील व्यक्त केलीये.

ए.आर.रहमानची ओळख देशातच नव्हे तर जगभरात आहे. ए.आर.रहमानचा मुलगा ए.आर. अमीन हा जेव्हा स्टेजवर आपला परफॉर्मन्स देत होता, तेव्हाव वरचे झुंबर पडले. मात्र, आपण या अपघातामधून थोडक्यात बचावल्याचे अमीन याने सांगितले आहे. अमीन म्हणाला की, एक सेकंद जरी मागे पुढे झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता.

ए.आर. अमीन पोस्टमध्ये म्हणाला की, मी अल्लाहचा, माझ्या आई-वडीलांचा, कुटुंबाचा आणि माझ्या चाहत्यांचे आभार मानतो मी सुरक्षित आणि जिवंत असल्याबद्दल…तीन दिवसापूर्वी एक मोठी घटना घडली. मी एका गाण्यासाठी शूटिंग करत होतो आणि मला टीमवर विश्वास होता की त्यांनी सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली असेल.

मी कॅमेऱ्यासमोर माझ्या कामावर लक्ष केद्रिंत केले असताना वरचा झुंबर आणि त्यावर टांगलेले सर्व काही क्रेनमधून पडले…मी त्याच्या बरोबर मध्यभागी उभा होतो. एक सेकंद जरी मागे पुढे झाले असते तर हे सर्वकाही माझ्या डोक्यात पडले असते. मी आणि माझी पूर्ण टिम मोठ्या धक्क्यात अजूनही आहोत. आता ए.आर. अमीन याच्या या पोस्टवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. ए.आर. अमीन याच्या बहिणीने देखील या पोस्टवर कमेंट केली आहे. या पोस्टवर कमेंट करताना ती भावूक झाल्याचे देखील दिसले आहे.