Arjun Kapoor | अर्जुन कपूर याने शेअर केली भावनिक पोस्ट, म्हणाला आता फोटोही संपत…

| Updated on: Feb 03, 2023 | 5:57 PM

तेंव्हापासूनच मलायका ही अर्जुन कपूर याला डेट करत आहे. अर्जुन कपूर याच्या रिलेशनमुळे अनेकदा मलायका अरोरा हिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जाते.

Arjun Kapoor | अर्जुन कपूर याने शेअर केली भावनिक पोस्ट, म्हणाला आता फोटोही संपत...
Follow us on

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) हा कायमच त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असतो. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा हे पार्ट्यांमध्येही सोबतच हजेरी लावतात. काही दिवसांपूर्वी एक अफवा सुरू होती की, अर्जुन कपूर याच्या पहिल्या बाळाची आई मलायका अरोरा ही होणार असून मलायका अरोरा ही प्रेग्नेंट (Pregnant) आहे. यावर अर्जुन कपूर याने थेट सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अनेकांचा समाचार घेतला होता. चाहते अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहात आहेत. अरबाज खान आणि मलायका अरोरा (Malaika Arora) यांचा २०१७ मध्ये घटस्फोट झाला होता. तेंव्हापासूनच मलायका ही अर्जुन कपूर याला डेट करत आहे. अर्जुन कपूर याच्या रिलेशनमुळे अनेकदा मलायका अरोरा हिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जाते.

नुकताच अर्जुन कपूर याने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केलीये. या पोस्टमुळेच आता अर्जुन कपूर हा चर्चेत आलाय. अर्जुन कपूर याने ही खास पोस्ट दुसऱ्या तिसऱ्या कोणत्याही व्यक्तीसाठी शेअर केली नाही तर त्याने त्याच्या आईसाठी ही पोस्ट शेअर केलीये.

मोना सुरी यांचा आज जन्म दिवस असून २०१२ मध्ये मोना सुरी यांचे निधन झाले आहे. मोना सुरी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी अर्जुन कपूर याने एक भावनिक पोस्ट शेअर केलीये.

अर्जुन कपूर याने सोशल मीडियावर एक जुने पत्र शेअर करत काही फोटो कोलाज केले आहेत. यामध्ये अर्जुन कपूर हा त्याच्या आईसोबत दिसत आहे. आता अर्जुन कपूर याची हिच पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

अर्जुन कपूर याने लिहिले की, आता फोटो संपत आहेत आई…माझेही शब्द संपले आहेत… पुन्हा काहीतरी लिहित आहे जे माझ्यातील मूल बाहेर आणते… माझी उर्जा आणि सामर्थ्य देखील संपले असेल… परंतू आज तुझा वाढदिवस आहे आणि तो माझ्यासाठी वर्षातील सर्वात खास दिवस आहे…

पुढे अर्जुन कपूर याने लिहिले, मी तुला वचन देतो की मी कधीही हार मानणार नाही…मी वचन देतो की नवीन ऊर्जा आणि शक्तीने काम करेल… मी वचन देतो की तू कुठेही असशील तरीही तुला माझा अभिमान वाटेल….Love you…माझ्या जगाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…