मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन (Aryan Khan) ड्रग्ज प्रकरणात अशा प्रकारे अडकला आहे की, गेल्या 7 दिवसांपासून त्याला एनसीबीच्या चौकशीला सामोरे जावे लागत आहे. आर्यन खानची रिलीज सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे. त्याचबरोबर खान कुटुंबही आर्यनबद्दल तणावात आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. असे म्हटले जात आहे की, या व्हिडीओमध्ये शाहरुख खान आपला मुलगा आर्यनला एनसीबी न्यायालयाबाहेर मिठी मारताना दिसत आहे.
व्हिडीओमध्ये, शाहरुख खानसारखा दिसणारा एक माणूस संपूर्ण काळ्या पोशाखात आहे. त्याने एक पोनीटेल बांधली आहे आणि सोबतच फेस मास्क घातला आहे. व्हिडीओमध्ये हे स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते की, तो माणूस एका मुलाला मिठी मारतो. मुलाने निळ्या रंगाचे डेनिम जॅकेट घातले आहे. आर्यन यापूर्वीही असाच पोशाख परिधान करताना दिसला होता. जो कोणी हा व्हिडीओ पहात आहे, त्याला असेच वाटते आहे की, किंग खान व्हिडीओमध्ये त्याचा मुलगा आर्यनला मिठी मारत आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, हा दावा खोटा आहे.
SRK met with Aryan Khan . #SRK #AryanKhan #ReleaseAryanKhan pic.twitter.com/A6yv0EnsDG
— Movie Critic (@Strawberrry927) October 7, 2021
होय, व्हिडीओमध्ये दिसणारे दोन्ही लोक ना शाहरुख खान आहे, ना आर्यन खान. हा व्हायरल व्हिडीओ बनावट आहे. कारण न्यायालयाच्या परवानगीशिवाय कुटुंबातील सदस्य आरोपींना भेटू शकत नाहीत, तेही सार्वजनिक ठिकाणी आणि कोणत्याही सुरक्षिततेशिवाय. दुसरे म्हणजे, जेव्हा आर्यन खानचे वकील सतीश मानशिंदे यांनी न्यायालयाकडून कौटुंबिक सदस्यांसाठी भेटीची परवानगी घेतली होती, तेव्हा शाहरुख खानची व्यवस्थापक पूजा ददलानी यांचे नाव त्यात होते, म्हणजे फक्त पूजाच आर्यन खानला भेटू शकते.
2 ऑक्टोबर रोजी एनसीबीच्या टीमने क्रूझ शिपमधील ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला. या क्रूझ शिपमधून आर्यन खानसह 8 लोकांना अटक करण्यात आली. आर्यनच्या 8 ऑक्टोबरला निर्णय होणार आहे, किंग खानच्या मुलाला ड्रग्ज प्रकरणात जामीन मिळतो की, तो तुरुंगात जातो हे पाहावे लागेल.
क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानसह (Aryan Khan) इतर सात आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे शाहरुख खानला मोठा धक्का बसला आहे. मात्र आर्यनच्या जामिनावर पुढील सुनावणी आज (शुक्रवार 8 ऑक्टोबर) होणार आहे. आर्यनची रवानगी तुरुंगात होणार की तो ‘मन्नत’वर जाणार, याचा फैसला होणार आहे.
कोर्टात आर्यन खान तसेच एनसीबीच्या वकिलांची खडाजंगी झाली. आर्यन खानच्या बाजूने अॅड सतीश मानेशिंदे यांनी बाजू मांडली. तर एनसीबीच्या बाजूने एएसजी अनिल सिंग यांनी युक्तिवाद केला. आर्यन खान, इतर सात आरोपी तसेच एनसीबीच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निकाल दिला.
Gauri Khan Birthday: कोठडीतल्या पोरासाठी जी बर्गर घेऊन गेली, एका सुपरस्टारचं जिनं घर सांभाळलं
Marathi Movie : रहस्यमय ‘अलिप्त’ आता प्रदर्शनासाठी सज्ज; थरार अनुभवायला मिळणार?