मुंबई : क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर आज (5 ऑक्टोबर) अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यानं एनसीबी कार्यलयात हजेरी लावली. यावेळी आर्यन खानच्या हातात एक साइकोलॉजिकल थ्रिलर पुस्तक दिसलं. आर्यन खान तुरुंगातून बाहेर आल्यानंतर काय करत असावा असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. त्यानंतर त्याच्या हातात एक पुस्तक दिसल्यानंतर त्याचीही चर्चा होऊ लागली आहे.
क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक झाल्यानंतर अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान तब्बल 27 दिवसानंतर तुरुंगातून बाहेर आला होता. कोर्टाने जामीन मंजूर करताना आर्यन खानसमोर अनेक अटी ठेवल्या होत्या. त्याला देशाबाहेर जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे. तसेच देशाबाहेर जायचे असेल तर त्याला न्यायालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे. या अटींव्यतिरिक्त त्याला दर शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत एनसीबीच्या कार्यालयात हजेरी लावायची आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आर्यन मीडियासमोर आलेला नव्हता. मात्र, आर्यन आज एनसीबी कार्यालयात दाखल झाला. यावेळी त्याचा हातात एक पुस्तक दिसले. या पुस्तकाचे नाव ‘द गर्ल विथ ड्रॅगन टॅटू’ असून हे एक सायकॉलॉजिकल थ्रिलर पुस्तक आहे.
एनसीबीच्या कार्यालयात हजेरी लावताना आर्यनच्या हातात हे पुस्तक दिसल्यामुळे अनेक तर्क लावले जात आहेत. हे पुस्तक स्टीग लार्सन यांनी लिहिलेले आहे. विशेष म्हणजे या पुस्तकाच्या कथेवरून नंतर चित्रपटदेखील तयार करण्यात आलेला आहे. या चित्रपटात ‘जेम्स बाँड’ अभिनेता डॅनियल क्रेग आणि अभिनेत्री रुनी मारा यांनी काम केलंय. विशेष म्हणजे या चित्रपटानने नंतर उत्कृष्ट संपादन या प्रवर्गात ऑस्करसुद्धा जिंकलेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आर्यन खान सध्या शाहरुख खानला त्याच्या आगामी चित्रपटासाठी मदत करत आहे. ही चर्चा सुरु असतानाच आर्यन खानच्या हातात हे पुस्तक दिसून आले आहे. त्यामुळे आर्यन खानने फिल्ममेकिंगकडे आपला मोर्चा वळवला का ? असा प्रश्न विचारला जात आहे.
दरम्यान, आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणी तब्बल 27 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर 30 ऑक्टोबर रोजी त्याची तुरुंगातून सुटला झाली होती. उच्च न्यायालयाच्या अटीनुसार तो एनसीबी कार्यालयात पोहोचला होता. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना 14 अटी घातल्या होत्या. त्याचा पासपोर्टदेखील एनसीबीने जमा केलेला आहे.
इतर बातम्या :
आर्यन खान प्रकरणाचा तपास संजय सिंग यांच्याकडे, कोण आहेत संजय सिंग?