मुंबई : शाहरुख खान याचा लेक आर्यन खान (Aryan Khan) त्याच्या पर्सनल लाईफमुळे कायमच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी एक चर्चा होती की, आर्यन खान हा नोरा फतेही हिला डेट करतोय. काही फोटोवरून ही चर्चा सुरू झाली. मात्र, आर्यन खान याचे एखाद्या मुलीसोबत नाव जोडले जाण्याची ही काही पहिली वेळ नक्कीच नाहीये. यापूर्वीही आर्यन खान याचे अनेक मुलींसोबत नाव जोडले आहे. यामध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची नात नव्या नवेली नंदा हिचा देखील समावेश होता. मात्र, नंतर हे स्पष्ट करण्यात आले की, नव्या आणि आर्यन फक्त चांगले मित्रच आहेत. आता एका मिस्ट्री गर्लसोबतचा (Mystery Girl) आर्यनचा फोटो व्हायरल होतोय.
आर्यन खान हा नोरा फतेही हिला डेट करत असल्याची चर्चा सुरू असतानाच आता आर्यन खान याचा मिस्ट्री गर्लसोबतचा फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
आर्यन खान नेमका कोणाला डेट करतोय? हाच प्रश्न आता हा फोटो पाहून अनेकांना पडला आहे. यापूर्वी अनेक मुलींसोबत आर्यन खान याचे नाव जोडले गेले होते.
आर्यन खान आणि पाकिस्तानी अभिनेत्री सादिया खान यांचाही फोटो व्हायरल होतोय. विशेष म्हणजे सादिया हिच्यासोबत जो व्हायरल होतोय तो न्यू इअरचा आहे. म्हणजेच स्पेशल व्यक्तीसोबत आर्यन खान याने नवीन वर्षाचे स्वागत केले आहे.
आर्यन खान हा लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. आर्यन खान याच्यासह तब्बल ७ स्टार किड्स २०२३ मध्ये बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार असून यामध्ये अमिताभ बच्चन यांचा नातू देखील आहे.
आर्यन खान याच्यासोबत जी मिस्ट्री गर्ल दिसत आहे ती नेमकी कोण हे अजूनही कळू शकले नाहीये. शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट २५ जानेवारी रोजी चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
आर्यन खान याचे नाव ड्रग्ज प्रकरणात आल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. याच प्रकरणात चंकी पांडे याची लेक अनन्या पांडे हिची देखील चाैकशी करण्यात आली होती. ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान याला काही दिवस जेलमध्ये देखील राहवे लागले होते.