मुंबई : चित्रपट जग हे असे विचित्र जग आहे की, या जगाच्या कथा पडद्यावर येतात, त्याचबरोबर असंख्य कथा आणि किस्से स्वतःमध्ये दडवून ठेवले जातात. चित्रपट जगताशी निगडित अभिनेते आणि अभिनेत्रींच्या अशा अनेक कथा तुम्ही ऐकल्या असतील, ज्याचं तुम्हाला आश्चर्य वाटलं असे. आज मी तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जिच्या अभिनयाचे संपूर्ण जगाने कौतुक केले. पण असे असूनही ती चित्रपट जगतापासून दूर गेली. हो आम्ही आयशा कपूरबद्दल बोलत आहे, जिने 2005 मध्ये ‘ब्लॅक’ चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते.
2005 मध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा ‘ब्लॅक’ नावाचा चित्रपट आल होता, ज्यात अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत होते आणि राणी मुखर्जी त्यांच्यासोबत होत्या. या चित्रपटात गुरु-शिष्याची कथा दाखवण्यात आली होती. अमिताभ बच्चन एका गुरूची भूमिका साकारतात, ज्यांना एका मुलीला (राणी मुखर्जी) प्रेरणा द्यावी लागते, जी आयुष्यात पुढे जाण्यासाठी स्वतः काही पाहू शकत नाही किंवा ऐकू शकत नाही. हा भारतीय सिनेमा सर्वात अद्वितीय आणि प्रायोगिक चित्रपट म्हणून ओळखला जातो. जेव्हा आयशाने या चित्रपटात राणी मुखर्जीच्या लहानपणाची भूमिका साकारली होती, तेव्हा ती खूप लहान होती.
या चित्रपटातील सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी अमिताभ बच्चन यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. राणी मुखर्जी यांनी अनेक पुरस्कारही जिंकले होते. या दोन महान कलाकारांमध्ये आयेशानेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिने आपल्या दमदार अभिनयाने चित्रपट जगतात आपली उपस्थिती दाखवून दिली. ही चिमुकली आगामी काळात बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्रींमध्ये असेल, अशी चर्चा त्यावेळी झाली होती. आयेशा कपूरने या चित्रपटासाठी फिल्मफेअर अवॉर्ड, झी सिने अवॉर्ड आणि आयफा पुरस्कारासह एकूण 7 पुरस्कार जिंकले. आता तुम्ही साहजिकच असा विचार करत असाल की, आयशाने इतक्या प्रसिद्धीनंतर बॉलिवूडपासून अंतर का ठेवले?
खुद्द आयेशाने एका मुलाखतीदरम्यान याचे कारण सांगितले. आयेशा ‘ब्लॅक’च्या चार वर्षानंतर 2009 मध्ये ‘सिकंदर’ या चित्रपटात काश्मिरी मुलीची भूमिका साकारली होती. त्या काळात तिने सांगितले की, तिने आपले संपूर्ण आयुष्य एकांतवासात घालवले आहे, तिला प्रसिद्धीची भीती वाटते. कोणाचेही आपल्याकडे फारसे लक्ष वेधायला नको असे तिला वाटत होते.
आय्शाचे वडील एक पंजाबी व्यापारी आहे, जेव्हा आयशाने पदार्पण केले, तेव्हा ती फक्त 11 वर्षांची होती. यामुळे, तिचे पालक तिला खूप संरक्षण देत होते. आयशाने चित्रपटांमध्ये काम करून तिच्या अभ्यासात अडथळा आणावा, अशी दोघांची इच्छा नव्हती. यामध्ये तिचे संपूर्ण कुटुंब मुंबईहून त्यांच्या मूळ गावी ऑरोविले येथे परतले. त्यानंतर तिने आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. काही काळानंतर तिच्या वडिलांनी तिला अमेरिकेत पाठवले. तेथे त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण केले.
आयशा कपूरचा जन्म 13 सप्टेंबर 1994 रोजी झाला होता. ती तामिळनाडूतील ‘ऑरोविले’ शहरात लहानाची मोठी झाली. आयशाच्या आईचे नाव जॅकलिन आहे आणि वडीलांचे नाव दिलीप कपूर, जे पंजाबमधील व्यापारी आहेत. आयेशाला तिचे मूळ गाव ‘ऑरोविले’ खूप आवडते. हे ठिकाण भारतातील सर्वात शांत क्षेत्रांपैकी एक मानले जाते.
‘रोमान्स किंग’ शाहरुख खानसोबत चित्रपटात काम करण्यास समंथाचा नकार? जाणून घ्या नेमकं कारण…
Dhamaka Trailer : कार्तिक आर्यनच्या ‘धमाका’चा ट्रेलर रिलीज, चित्रपटात दिसणार सस्पेन्स-थ्रिलरची जादू…