मुंबई : अभिनेता आयुष्मान खुरानासाठी गेले काही दिवस ठीक गेले नसून सातत्याने आयुष्मानचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जात आहेत. सुरूवातीच्या काळात आयुष्मानने अनेक हीट चित्रपट दिले. मात्र, अनेक आणि नुकताच रिलीज झालेला डाॅक्टर जी हे चित्रपट बाॅक्स आॅफिसर फ्लाॅप गेल्याने अनेक चर्चा सुरू आहेत. डाॅक्टर जी या चित्रपटात आयुष्मान डाॅक्टराचा भूमिकेत होता. या चित्रपटाकडून सर्वांनाच खूप जास्त अपेक्षा होत्या. मात्र, प्रत्यक्षात हा चित्रपट काही खास कमाल करू शकला नाही.
सततच्या फ्लाॅप चित्रपटांवर बोलताना आयुष्मान खुराना म्हणाला की, मी कधीच चित्रपट फ्लाॅप गेल्यावर खूप काही विचार करत बसत नाही. कारण मी सुरूवातीपासूनच अशा स्टोरी घेतल्या की, ज्यावर इतर कलाकार काम करत नाहीत.
आयुष्यान खुराना म्हणाला की, आपला भारत देश हा होमोफोबिक देश आहे. मी माझ्या करिअरची सुरुवात अशा चित्रपटातून केली ज्यात काम करणे अनेकांना आवडत नव्हते. परंतू हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करू शकले नाहीत हे खरोखरच दुर्दैवी आहे.
याचे खरे कारण म्हणजे आपला देश अजूनही होमोफोबिक विचारसरणीत बुडालेला आहे, असेही आयुष्मान म्हणाला आहे. मी कधीच हीट आणि फ्लाॅपवर लक्ष दिले नाहीये. मी प्रत्येक चित्रपटामध्ये माझे बेस्ट देण्याचाच काम प्रयत्न करतो.
पुढे आयुष्मान म्हणाला की, खरे सांगायचे आहे तर माझे जवळपास सर्वच चित्रपट फार कमी बजेटचे असतात. यामुळे चित्रपट फ्लाॅप गेला तरीही खूप काही जास्त नुकसान होत नाही.