मुंबई : गेल्या काही दिवसांपासून आयुष्मान खुरानाचा अॅन अॅक्शन हिरो हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. हा चित्रपट तयार करण्यासाठी तब्बल 40 कोटी रूपये खर्च झाले आहेत. या चित्रपटाकडून सुरूवातीपासूनच मोठ्या अपेक्षा आहेत. हा चित्रपट नुकताच रिलीज झालाय. मात्र, पहिल्या दिवशी चित्रपटाची कमाई अत्यंत निराशाजनक नक्कीच आहे. पहिल्या दिवशी हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करेल, अशी अपेक्षा सर्वांना होती. परंतू प्रत्यक्षात या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवलीये.
अजय देवगणचा दृश्यम 2 हा चित्रपट रिलीज होऊन इतके दिवस होऊनही बाॅक्स आॅफिसवर सुसाट अशी कामगिरी करतोय. दुसरीकडे गेल्या आठवड्यामध्ये वरुण धवनचा रिलीज झालेला भेडिया देखील आहे.
आयुष्मानचा अॅन अॅक्शन हिरो रिलीज झाल्यामुळे दृश्यम 2 ला फटका बसले, असे सांगितले जात होते. परंतू याचा फटका दृश्यम 2 बसला नाहीये. पहिल्या दिवशी हा चित्रपट जबरदस्त अशी ओपनिंग करण्यात अपयशी ठरलाय.
दृश्यम 2 चा फटका भेडिया या चित्रपटाला नक्कीच बसला आहे. कारण दृश्यम 2 रिलीज होऊन इतके दिवस झाले असताना देखील बाॅक्स आॅफिसवरील दृश्यम 2 चे कलेक्शन भेडियापेक्षा जास्त आहे.
आयुष्मान खुरानाचा अॅन अॅक्शन हिरो हा चित्रपट विकेंडला धमाका करू शकतो, अशी अपेक्षा आहे. ओपनिंग डे बघता चित्रपटाचे बजेट काढणे देखील अवघड असल्याचे दिसत आहेत.
अॅन अॅक्शन हिरो चित्रपटाने ओपनिंग डेला 1.31 कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन झाले आहे. सकाळच्या सत्रामध्ये तर प्रेक्षकांचा जास्त प्रतिसाद चित्रपटाला नव्हता. शनिवार आणि रविवार चित्रपटाच्या बाॅक्स आॅफिस कलेक्शनसाठी महत्वाचा ठरणार आहे.