मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे(Ananya Panday) ड्रग्ज प्रकरणाबाबत एनसीबीच्या तावडीत अडकली आहे. गुरुवारी एनसीबीने आर्यन खान ड्रग्स प्रकरणाबाबत अनन्या पांडेची 2 तास चौकशी केली. एनसीबीने ड्रग्जबाबत आर्यन आणि अनन्या यांच्यातील संभाषणावर अभिनेत्रीची चौअक्षी केली. एनसीबीने अनन्याला ड्रग्जबद्दल प्रश्न विचारले.
आर्यन खान आणि अनन्या पांडेच्या गप्पांमध्ये आर्यन अनन्याशी एका ठिकाणी गांजाबद्दल बोलत होता. आर्यन विचारत होता की, काही जुगाड होऊ शकते का? यावर अनन्याने उत्तर दिले आणि सांगितले की, मी व्यवस्था करीन.
एनसीबीने अनन्याला हे चॅट दाखवले आणि काही प्रश्न विचारले, ज्यावर अनन्या म्हणाली की, ती फक्त विनोद करत होती. अनन्या पांडेने एनसीबीच्या अधिकाऱ्यांना सांगितले की आर्यनशी तिच्या गप्पा ड्रग्सबद्दल नाही तर सिगारेटबद्दलच्या आहेत. दोघांमध्ये सिगारेटबद्दल संभाषण झाले होते. अनन्याने सांगितले की, तिने कधीही ड्रग्जचे सेवन केले नाही.
एनसीबीच्या मते, आतापर्यंत असे कोणतेही पुरावे सापडले नाहीत की अनन्याने आर्यनसाठी कधीच कोणत्याही ड्रग्जची व्यवस्था केली आहे. मात्र, आर्यन-अनन्या यांनी ड्रग्जबाबत एकदा नव्हे, तर अनेक वेळा संभाषण केले आहे.
पहिल्या दिवसाच्या चौकशीत अनन्या वडील चंकी पांडेसोबत पोहोचली होती. चौकशी कक्षात प्रवेश करण्यापूर्वी अनन्या खूप घाबरली होती आणि वडील चंकी पांडेला मिठी मारून रडली. नंतर, अनन्या एकटीच चौकशी कक्षात दाखल झाली, जिथे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी तिची चौकशी केली.
विशेष म्हणजे समीर वानखेडे यांनी स्वत: अनन्याची चौकशी केली. यावेळी एक महिला अधिकारी देखील होत्या. त्यांनी अनन्याला तिच्या आर्यन सोबतच्या मैत्रीबाबत विचारलं. तसेच तिला ड्रग्स पेडलरबाबत विचारलं. तिच्यात आणि आर्यन यांच्यात झालेले संवाद तिला दाखवण्यात आले. त्या चॅटबाबत तिला विचारण्यात आलं.
मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबर रोजी कार्डेलिया जहाजावर धाड टाकली होती. यावेळी जहाजावर रेव्ह पार्टी सुरु असल्याचे उघडकीस आलं होतं. या ठिकाणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. आर्यन खान हा सध्या जेलमध्ये आहे. मात्र, त्याच्या चौकशीतून अनेक गोष्टींचा उलगडा झाला आहे. एनसीबी अधिकाऱ्यांनी आर्यनचे व्हाट्सअॅप चॅट मिळवले होते. यात अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे. यात अभिनेत्री अनन्या पांडे हिचंदेखील नाव आहे. आर्यन खान आणि अनन्या यांच्यात ड्रग्सबाबत चर्चा झाल्याचं एनसीबी अधिकाऱ्यांच म्हणणं आहे. या दोघांतील व्हाट्सअॅप संवाद एनसीबी अधिकाऱ्यांनी कोर्टात सादर केला होता. त्यामुळे आर्यनला जामीन मिळण्यास अडचण झाली.